MOEF Bharti 2025: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MOEF) अंतर्गत सल्लागार, खाजगी सचिव, कनिष्ठ अनुवादक पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांसाठी शेवटच्या तारखा वेगवेगळ्या असून उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रता व अटी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
MOEF सल्लागार भरती 2025 (ऑनलाइन अर्ज)
मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयात सल्लागार A व B या पदांसाठी 10 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून 12 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.
MOEF खाजगी सचिव व कनिष्ठ अनुवादक भरती 2025 (ऑफलाईन अर्ज)
मंत्रालयाच्या शिलाँग प्रादेशिक कार्यालयासाठी खाजगी सचिव व कनिष्ठ अनुवादक या दोन पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑफलाईन करायचा असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 (45 दिवस) आहे.
पदांची माहिती
पदाचे नाव
पदसंख्या
खाजगी सचिव
01
कनिष्ठ अनुवादक
01
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
पात्रता
खाजगी सचिव
—
कनिष्ठ अनुवादक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी व इंग्रजी विषय अनिवार्य/ऐच्छिक किंवा माध्यम म्हणून असणे आवश्यक
वेतनश्रेणी
पदाचे नाव
वेतन
खाजगी सचिव
Level-7 (₹44,900–1,42,400)
कनिष्ठ अनुवादक
Pay Band-2 ₹9,300–34,800 + GP ₹4,200
अर्ज पत्ता
उपमहानिरीक्षक (मध्यवर्ती) आणि कार्यालय प्रमुख, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, प्रादेशिक कार्यालय, लुम्बटनगेन, शिलाँग – 793021
महत्त्वाच्या सूचना
अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद केला जाईल.