पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्टसह विविध 83 पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Pune Arogya vibhag Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Pune Arogya vibhag Bharti 2025: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटीमार्फत विविध वैद्यकीय व आरोग्यसेवेशी संबंधित पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत बालरोगतज्ञ (पूर्णवेळ), पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा एकूण 83 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

ही भरती पुणे शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विविध तांत्रिक, वैद्यकीय आणि व्यवस्थापकीय पदांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांसह पॅरामेडिकल उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

पदनिहाय रिक्त जागांचा तपशील – Pune Arogya vibhag Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
बालरोगतज्ञ – पूर्णवेळ02
पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM)04
प्रयोगशाळा तंत्रज्ञ13
फार्मासिस्ट02
बहुउद्देशीय आरोग्य सेवक64
एकूण83

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

  • बालरोगतज्ञ (पूर्णवेळ): MD Pediatrics किंवा DNB, MCI/MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य.
  • पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM): MBBS किंवा Health Sciences मधील पदवी (BDS, BAMS, BUMS, BHM S, BPTH, Nursing, B.Pharm) तसेच MPH/MHA/MBA (Health Care Administration).
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: B.Sc पदवी व DMLT उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य.
  • फार्मासिस्ट: D.Pharm उत्तीर्ण, फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य.
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक: 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण व Paramedical Basic Training Course किंवा शासकीय संस्थेतील Sanitary Inspector कोर्स.

वयोमर्यादा

  • पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM): खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे, आरक्षित प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे.
  • इतर पदे (बालरोगतज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक): कमाल 65 वर्षे.

वेतनश्रेणी

पदाचे नावमासिक वेतन
बालरोगतज्ञ – पूर्णवेळरु. 75,000/-
पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM)रु. 32,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु. 17,000/-
फार्मासिस्टरु. 17,000/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवकरु. 18,000/-

अर्ज पद्धत व पत्ता

या भरतीसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन,
नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजीनगर, पुणे – 411005

अधिकृत माहिती व जाहिरात PDF पाहण्यासाठी उमेदवारांनी http://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/vMs0l
अधिकृत वेबसाईटhttp://arogya.maharashtra.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा