WCD Pune Bharti 2025: महिला व बाल विकास विभाग, पुणे यांनी संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून एकूण 17 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. पदांसाठीची शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राहणार असून उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना S6 वेतनश्रेणीनुसार 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन विभागाने केले आहे. ठरवलेल्या तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी विभागाने दिलेली PDF जाहिरात पाहण्याची सूचना दिली आहे.
रिक्त पदांची माहिती – WCD Pune Bharti 2025
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) | 17 |
वेतन माहिती
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
|---|---|
| संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) | S6 – Rs. 19,900 ते 63,200 |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/PvWEz |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/z7ove |
| अधिकृत वेबसाईट I | https://www.maharashtra.gov.in |
| अधिकृत वेबसाईट II | www.wcdcommpune.com |
