Army Ordnance Corps Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps – AOC) अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 2,615 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड्समन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि मटेरियल असिस्टंट या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना 22 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
पदनिहाय रिक्त जागा – Army Ordnance Corps Recruitment 2026
| पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|
| ट्रेड्समन मेट | 1,799 |
| फायरमन | 508 |
| कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA) | 104 |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 142 |
| मटेरियल असिस्टंट | 50 |
| एकूण | 2,615 |
शैक्षणिक पात्रता
| पद | पात्रता |
| ट्रेड्समन मेट | मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण |
| फायरमन | मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण |
| कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | 12वी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट |
| मल्टी-टास्किंग स्टाफ | 10वी उत्तीर्ण |
| मटेरियल असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी |
वेतनश्रेणी
| पद | वेतन |
| ट्रेड्समन मेट | ₹18,000 ते ₹56,900 (Level-1) |
| फायरमन | ₹19,900 ते ₹63,200 (Level-2) |
| कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | ₹19,900 ते ₹63,200 (Level-2) |
| मल्टी-टास्किंग स्टाफ | ₹18,000 ते ₹56,900 (Level-1) |
| मटेरियल असिस्टंट | ₹29,200 ते ₹92,300 (Level-5) |
अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 24 ऑगस्ट 2026 असून 22 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक भरावी. अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि पात्रतेच्या अटींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 ऑगस्ट 2026
- अर्जाची अंतिम तारीख: 22 सप्टेंबर 2026
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अधिकृत संकेतस्थळ: https://aocrecruitment.gov.in/
सरकारी संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटींचे पालन करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/v7ODxi86l |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/8jT27 |
| अधिकृत वेबसाईट | https://aocrecruitment.gov.in/ |
