भारतीय सेनेने Indian Army Internship Programme (Indian Army Internship 2026) 2026 अंतर्गत Artificial Intelligence (AI) आणि Machine Learning (ML) क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष इंटर्नशिपची घोषणा केली आहे. देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा 75 दिवसांचा पूर्णवेळ इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सेनेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून, इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ₹75,000 पर्यंत स्टायपेंड देण्यात येणार आहे.
या इंटर्नशिपचा कालावधी 75 दिवसांचा असून, प्रशिक्षणाचे ठिकाण नवी दिल्ली (Delhi) येथे असणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 4 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून इंटर्नशिपला 1 सप्टेंबर 2026 पासून सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची माहिती : Indian Army Internship 2026
| बाब | तपशील |
|---|---|
| संस्था | Indian Army |
| इंटर्नशिप | Artificial Intelligence & Machine Learning |
| कालावधी | 75 दिवस |
| प्रकार | Full Time |
| ठिकाण | Delhi |
| स्टायपेंड | ₹75,000 पर्यंत |
| अर्ज सुरू | 4 ऑगस्ट 2026 |
| इंटर्नशिप सुरू | 1 सप्टेंबर 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 19 ऑगस्ट 2026 |
| क्रेडिट्स | 15 |
या प्रकल्पामध्ये भारतीय सेनेच्या Armoured Formation साठी AI आधारित Kill Chain System विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे रणांगणातील विविध स्रोतांमधून मिळणारी माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. टँक, Infantry Combat Vehicles, Unmanned Aerial Vehicles (UAVs), Intelligence, Surveillance and Reconnaissance (ISR), Electronic Intelligence (ELINT), Human Intelligence (HUMINT) तसेच विद्यमान Command and Control Systems मधील माहितीचा वापर करून संभाव्य धोक्यांची ओळख, वर्गीकरण आणि निष्प्रभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्याचे काम इंटर्नकडून केले जाणार आहे. यामुळे युद्धस्थितीत निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक करण्यास मदत होईल.
या इंटर्नशिपसाठी केवळ B.Tech./B.E. किंवा समतुल्य अभ्यासक्रमामध्ये Artificial Intelligence आणि Machine Learning या विशेष शाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच अर्जदाराने संपूर्ण 75 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध असणे आणि संबंधित क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये व आवड असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना मूळ कागदपत्रांसह त्याच्या प्रती सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिक्षण संस्थेकडून जारी केलेले Degree Verification Certificate, स्थानिक प्राधिकरणाकडून मिळालेला Police Verification Certificate, आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असतील. आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते.
इंटर्नना औपचारिक पोशाखाचे पालन करावे लागेल. पुरुष उमेदवारांनी फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स आणि फॉर्मल शूज तर महिला उमेदवारांनी इंडियन सूट किंवा वेस्टर्न फॉर्मल पोशाख परिधान करणे आवश्यक आहे.
कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली असून सोमवार ते शनिवार कामकाजाचे दिवस असतील. कार्यालयीन परिसरात स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरण्यास परवानगी नसणार आहे. आवश्यक असल्यास निवड प्रक्रियेनंतर विशेष परवानगी दिली जाऊ शकते. मात्र संस्थेकडून इंटरनेटसह आवश्यक संगणकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व इंटर्ननी गोपनीयता, माहिती सुरक्षा आणि संस्थेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.
हेही वाचा : NTPC Bharti 2026 | इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी खुशखबर! एनटीपीसीमध्ये 135 उप-व्यवस्थापक पदांची भरती; 20 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
Maha CID Pune Bharti 2026 | सरकारी नोकरीची मोठी संधी! राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
उमेदवारांना भारतीय सेनेच्या विविध इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार असला तरी अंतिमतः केवळ एका ऑफर लेटरचा स्वीकार करता येईल. स्टायपेंडची रक्कम इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक उपस्थिती व इतर सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच दिली जाईल. अंतिम स्टायपेंडची रक्कम उपस्थितीच्या आधारे निश्चित केली जाईल.
या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार असला तरी इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेनेकडून नोकरी किंवा प्लेसमेंटची कोणतीही हमी दिली जाणार नाही. तसेच निवासाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची असून Police Verification Certificate सादर करणे अनिवार्य असेल.
