Aurangabad High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आस्थापनेवर “स्वयंपाकी” पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये १७ उमेदवारांची निवड यादी आणि ४ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.
ही भरती मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार एस-३ वेतन मॅट्रिक्स (₹16,600 ते ₹52,400) तसेच नियमानुसार भत्ते मिळणार आहेत.
पदाचे नाव व जागांचा तपशील
| पदाचे नाव | एकूण रिक्त पदे | दिव्यांगांसाठी राखीव | निवड यादी | प्रतीक्षा यादी |
|---|---|---|---|---|
| स्वयंपाकी | १८ | १ | १७ | ४ |
शैक्षणिक पात्रता व आवश्यक अटी
या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहणार आहे.
उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक असून शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ बनविता येणे गरजेचे आहे.
अनुभवाला प्राधान्य
कुकिंगमधील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार तसेच पंचतारांकित/त्रितारांकित हॉटेल, मान्यताप्राप्त संस्था किंवा शेफ/स्वयंपाकी म्हणून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख:
१० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
प्रबंधक (प्रशासन),
मुंबई उच्च न्यायालय,
खंडपीठ औरंगाबाद,
जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया घेण्यात येईल. निवड प्रक्रियेत खालील टप्पे असतील:
| निवड प्रक्रिया | गुण |
|---|---|
| स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा | ३० |
| शारीरिक कार्यक्षमता चाचणी | १० |
| तोंडी मुलाखत | १० |
| एकूण गुण | ५० |
स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत किमान १५ गुण मिळवणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
भरतीसाठी सुरुवातीला अर्ज करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी ₹२०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर द्यावा लागणार आहे. हे शुल्क परत केले जाणार नाही.
महत्त्वाच्या सूचना
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वैद्यकीय तपासणी आणि पोलीस चारित्र्य पडताळणीच्या अहवालावर अवलंबून राहील. तसेच नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल.
ही भरती प्रक्रिया, वेळापत्रक आणि इतर अपडेटसाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
पद: स्वयंपाकी
एकूण जागा: १८
अर्जाची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६
अर्ज पद्धत: ऑफलाइन (स्पीड पोस्ट)
हेही वाचा : BHEL मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ३८० ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती | BHEL Bharti 2026
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; १२वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी | SDCC Bank Bharti 2026
| PDF जाहिरात | https://lnk.ua/x3JIoxVJj |
| अधिकृत वेबसाईट | https://bombayhighcourt.gov.in/ |
