Bank of India Recruitment 2026 | बँक ऑफ इंडिया अंतर्गत 205 पदांची भरती; विविध व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी ऑनलाइन अर्ज

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

बँकिंग आणि आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियाने(Bank of India Recruitment 2026)एक महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि अधिकारी अशा विविध पदांच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून 10 सप्टेंबर 2026 पासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे.

या भरतीमध्ये आयटी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक पदांचा समावेश आहे. Full-Stack Engineering, Digital Platforms, Data Engineering, Information Security, Cyber Security, Database Administration, DevSecOps Engineering, Data Analytics यांसह Law Officer, Fire Officer, Security Officer आणि Civil Engineer या पदांचाही समावेश आहे.

पदनिहाय जागांचा तपशील : Bank of India Recruitment 2026

स्केलपदांचा प्रकारपदसंख्या
Scale IVChief Manager10
Scale IIISenior Manager49
Scale IIManager118
Scale IOfficer28
एकूण205

Scale IV अंतर्गत Chief Manager पदांच्या एकूण 10 जागा आहेत. यामध्ये Full-Stack Engineering, Digital Platforms, Supply Chain/Trade Finance Technology, Digital Banking Operations, IT Procurement, IT आणि Information Security यांसारख्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी वयोमर्यादा पदानुसार 28 ते 42 वर्षांपर्यंत आहे.

Scale III अंतर्गत Senior Manager पदांच्या 49 जागा असून Full-Stack Engineering, Digital Platforms, Finacle Application Support, Infrastructure Operations, Solution & Technology Architecture, Data Engineering, API Governance & Security, DevSecOps Engineering, Information Security आणि IT Procurement Specialist यांसारख्या पदांचा समावेश आहे.

Scale II अंतर्गत सर्वाधिक 118 जागा आहेत. यामध्ये Manager – Full-Stack Engineering, Digital Platforms, Application Support & Operations, Infrastructure Operations, Data Analytics, DevSecOps Engineering, Information Security, Law Officer, Fire Officer आणि Security Officer यांसह विविध पदे आहेत.

Scale I अंतर्गत Officer पदांच्या 28 जागा आहेत. यामध्ये Full-Stack Engineering, Application Support & Operations, Data Analytics, Data Engineering, QA & Test Engineering, Information Security आणि Civil Engineer या पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीतील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. विविध आयटी पदांसाठी संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech, MCA, M.Tech किंवा समकक्ष पात्रता आवश्यक असल्याचे दिले आहे. काही पदांसाठी किमान 50 टक्के गुणांची अट आहे. Information Security आणि संबंधित काही पदांसाठी CISA, CISM किंवा CISSP यांसारख्या पात्रतांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Law Officer, Fire Officer, Security Officer आणि Civil Engineer या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची संपूर्ण शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये तपासणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

भरतीतील पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. काही Officer पदांसाठी 21 ते 30 वर्षे, तर Manager पदांसाठी साधारणपणे 25 ते 35 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. Senior Manager पदांसाठी पदानुसार 28 ते 40 वर्षांपर्यंत, तर Chief Manager पदांसाठी 28 ते 42 वर्षांपर्यंत वयोमर्यादा दिली आहे.

वेतनश्रेणी

बँक ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये विविध स्केलनुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे आहे:

स्केलवेतनश्रेणी
JMGS-I₹48,480 ते ₹85,920
MMGS-II₹64,820 ते ₹93,960
MMGS-III₹85,920 ते ₹1,05,280
SMGS-IV₹1,02,300 ते ₹1,20,940

हेही वाचा : Income Tax Department Bharti 2026 | आयकर विभागात 82 पदांची भरती; पदवीधर आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

IBPS RRB Bharti 2026 | IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी पदांची मोठी भरती; पदवीधारकांना संधी

अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा

SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी 175 रुपये, तर सामान्य आणि इतर उमेदवारांसाठी 1,180 रुपये अर्ज शुल्क आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून 25 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जातील सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचनांनुसारच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात https://lnk.ua/9ZBBipZ91
ऑनलाईन अर्ज करा (१० सप्टेंबर पासून )https://lnk.ua/7HXRkQgmG
अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

Bank of India Recruitment 2026 | सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडिया (Bank of India Recruitment 2026) अंतर्गत क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदांच्या एकूण 779 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 30 जून 2026 पासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावा.

भरतीचा तपशील : Bank of India Recruitment 2026

बाबमाहिती
संस्थेचे नावबँक ऑफ इंडिया (Bank of India)
पदाचे नावक्रेडिट ऑफिसर (Credit Officer)
एकूण पदसंख्या779
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू30 जून 2026
अर्जाची अंतिम तारीख20 जुलै 2026

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपल्या पात्रतेची खात्री करून घ्यावी.

वयोमर्यादा

पदानुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

पदवयोमर्यादा
Credit Officer (GBO Stream) – MMGS-II25 ते 32 वर्षे
Credit Officer (GBO Stream) – MMGS-III28 ते 38 वर्षे
Credit Officer (GBO Stream) – SMGS-IV32 ते 45 वर्षे

उमेदवारांनी अर्ज करताना संबंधित पदासाठी लागू असलेली वयोमर्यादा तपासून अर्ज करावा.

अर्ज शुल्क

अर्जासाठी प्रवर्गानुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

प्रवर्गअर्ज शुल्क
SC / ST / PWD₹175 (Intimation Charges)
सामान्य व इतर प्रवर्ग₹850 (Application Fee + Intimation Charges)

अर्ज कसा कराल?

बँक ऑफ इंडिया भरती 2026 साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी निर्धारित स्वरूपात अपलोड करावी.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्यामुळे अधिकृत PDF जाहिरात तपासावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026 असून त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी आणि सविस्तर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा.
PDF जाहिरात -1https://shorturl.at/OUh8z
PDF जाहिरात -2https://shorturl.at/nVBrb
ऑनलाईन अर्ज करा (30 जून 2026 पासून सुरु)https://shorturl.at/c6e4r
अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा