BEML Ltd Bharti 2026 | ITI ते पदवीधर उमेदवारांसाठी BEML मध्ये मोठी संधी; विविध पदांच्या १३४६ शिकाऊ जागांसाठी भरती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अर्थात(BEML Ltd Bharti 2026)अंतर्गत विविध प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांच्या एकूण १,३४६ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये आयटीआयपासून पदवीधर उमेदवारांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित ट्रेड किंवा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.

BEML भरती २०२६ अंतर्गत पदवीधर (तांत्रिक) शिकाऊ उमेदवार, पदवीधर (सामान्य) शिकाऊ उमेदवार, पदविकाधारक शिकाऊ उमेदवार आणि आयटीआय शिकाऊ उमेदवार या प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख सप्टेंबर २०२६ आहे.

BEML भरती २०२६ : BEML Ltd Bharti 2026

घटकतपशील
संस्थेचे नावभारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML)
पदाचे नावविविध शिकाऊ उमेदवार पदे
एकूण जागा१,३४६
अर्ज पद्धतीऑनलाइन
किमान वय१७ वर्षे
अंतिम तारीख८ सप्टेंबर २०२६
अधिकृत वेबसाइटBEML

कोणत्या उमेदवारांना संधी?

या भरतीमध्ये चार प्रमुख प्रवर्गांचा समावेश आहे. पदवीधर (तांत्रिक) प्रवर्गासाठी चार वर्षांच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन सायन्स, E&T, AI & ML आणि एरोनॉटिकल यांसारख्या शाखांचा समावेश आहे.

पदवीधर (सामान्य) प्रवर्गासाठी तीन वर्षांच्या पूर्णवेळ पदवीमध्ये B.Sc, B.Com, BCA, BBA आणि BBA (HR) या पात्रता नमूद करण्यात आल्या आहेत.

पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रवर्गात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांसारख्या शाखांचा समावेश आहे.

तर ITI शिकाऊ उमेदवारांसाठी Fitter, Welder, Turner, Machinist, Electrician, COPA, Mechanic Diesel, Carpenter, Tool & Die Making, Sheet Metal, Plumber, Mechanic Auto Electrical & Electronics, MMV आणि Electronic Mechanic अशा ट्रेडचा उल्लेख करण्यात आला आहे.

मासिक स्टायपेंड

प्रवर्गमासिक स्टायपेंड
Graduate (Technical)₹१२,३००
Graduate (General)₹१२,३००
Diploma₹१०,९००
ITI₹९,६०० किंवा ₹१०,५६०

हेही वाचा : NHAI Bharti 2026 | NHAI मध्ये ६० पदांसाठी भरती; सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधारकांना नोकरीची संधी, २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज

Fresher Jobs in Pune 2026: पुण्यात eClerx मध्ये 119 पदांसाठी भरती; फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १७ वर्षे आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण राहिल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२६ असल्याने इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरतीची पदनिहाय पात्रता, ट्रेडनुसार अटी आणि इतर सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/fTg4Wh9Jg
NAPS नोंदणी (ITI)https://lnk.ua/JCoQ5vU51
NATS नोंदणी (Degree/Diploma)https://lnk.ua/VIKgwFvUc
ऑनलाईन अर्ज कराhttps://lnk.ua/poJOEWq7o
अधिकृत वेबसाईटhttps://www.bemlindia.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा