DRDO CEPTAM Bharti 2025: सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (DRDO CEPTAM) अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) आणि तंत्रज्ञ-ए (Tech-A) या पदांसाठी एकूण 764 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती DRDO च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
भरतीतील पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
DRDO CEPTAM Vacancy 2025
| पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
|---|---|
| वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (STA-B) | 561 |
| तंत्रज्ञ-ए (Tech-A) | 203 |
वेतनश्रेणीदेखील पदानुसार जाहीर करण्यात आली आहे. STA-B पदासाठी लेव्हल 6 (35,400–1,12,400 रुपये) तर Tech-A पदासाठी लेव्हल 2 (19,900–63,200 रुपये) वेतनश्रेणी लागू आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. DRDO संकेतस्थळावर अर्ज करण्याची लिंक, तसेच आवश्यक सूचना उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज सादर करताना कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करूनच फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
DRDO CEPTAM Bharti 2025
| PDF जाहिरात | https://shorturl.at/e97Gp |
| ऑनलाईन अर्ज करा (09 डिसेंबर 2025 पासून सुरु) | https://drdo.gov.in/drdo/ |
| अधिकृत वेबसाईट | https://drdo.gov.in/drdo/ |
