Earn without Job: चांगली नोकरी मिळवण्यासाठी उच्च शिक्षण आणि मेहनत आवश्यक असते, मात्र भारतात अशी एक परीक्षा आहे जिच्या माध्यमातून कोणतीही नियमित नोकरी न करता सरकारकडून दरमहा भरीव स्टायपेंड मिळू शकते. ही परीक्षा म्हणजे UGC NET आणि त्यासोबत मिळणारी JRF (Junior Research Fellowship). संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जाते.
UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी National Eligibility Test (NET) घेते. या परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतात. तसेच जे उमेदवार JRF साठी निवडले जातात, त्यांना संशोधनासाठी सरकारकडून नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते.
JRF आणि SRF अंतर्गत मिळणारे स्टायपेंड
यूजीसीच्या 20 सप्टेंबर 2023 च्या बैठकीत फेलोशिप रकमेतील वाढ जाहीर करण्यात आली. त्यानुसार JRF साठी पहिल्या दोन वर्षांत दरमहा ₹37,000 तर त्यानंतर SRF (Senior Research Fellowship) अंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ₹42,000 दिले जातात.
स्टायपेंडचा तपशील – Earn without Job
| फेलोशिप टप्पा | कालावधी | दरमहा रक्कम |
|---|---|---|
| JRF | 2 वर्षे | ₹37,000 |
| SRF | 3 वर्षे | ₹42,000 |
कंटीजन्सी ग्रँट
संशोधनासाठी लागणाऱ्या साहित्य व इतर गरजांसाठी वार्षिक कंटीजन्सी ग्रँटही दिली जाते.
वार्षिक ग्रँट तपशील
| शाखा | JRF | SRF |
| मानव्य / समाजशास्त्र | ₹10,000 | ₹20,500 |
| विज्ञान | ₹12,000 | ₹25,000 |
JRF चे दोन वर्षे, SRF ची तीन वर्षे आणि ही अतिरिक्त ग्रँट मिळून एकूण रक्कम पाच वर्षांत ₹24 लाखांहून अधिक होते. ही संपूर्ण मदत केवळ शिक्षण आणि संशोधनासाठी दिली जाते.
परीक्षा वेळापत्रक
NTA च्या माहितीनुसार UGC NET डिसेंबर 2025 परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत CBT पद्धतीने होणार आहे. विषयनिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असून उमेदवारांनी नियमितपणे ugcnet.nta.nic.in संकेतस्थळ पाहावे.
अर्ज प्रक्रिया
UGC NET साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असतो. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर फी भरून अर्ज सबमिट करावा लागतो.
अर्ज शुल्क
| श्रेणी | फी |
| General | ₹1,150 |
| OBC-NCL / EWS | ₹600 |
| SC / ST / दिव्यांग / ट्रान्सजेंडर | ₹325 |
UGC NET JRF चे फायदे
संशोधनात करिअरची सुवर्णसंधी, दरमहा भरीव फेलोशिप, स्वतंत्र संशोधन ग्रँट, तसेच PSU आणि शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
