NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये “युवा व्यावसायिक” तसेच जोखीम व्यवस्थापन, डेटा सायन्स, वित्तीय विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या विविध वरिष्ठ पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून, पदानुसार अर्ज करण्याच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत.
युवा व्यावसायिक पदासाठी 44 जागा – NABARD Bharti 2026
नाबार्ड मुंबई अंतर्गत “युवा व्यावसायिक” या पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2026 आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, यासंदर्भात सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत देण्यात आलेली आहे.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
युवा व्यावसायिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. अर्ज शुल्क 150 रुपये इतके ठेवण्यात आले आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
युवा व्यावसायिक भरतीचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या | वेतन |
|---|---|---|
| युवा व्यावसायिक | 44 | ₹70,000 प्रतिमहिना |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/QDDhI |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/tm5sn |
| अधिकृत वेबसाईट | nabardsociety.com |
नाबार्ड मुंबईत विविध वरिष्ठ पदांसाठी 17 जागांची भरती
नाबार्डने याचबरोबर विविध वरिष्ठ व तांत्रिक पदांसाठीही भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 17 रिक्त जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जानेवारी 2026 आहे. सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे.
या भरतीमध्ये अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, विविध प्रकारचे जोखीम व्यवस्थापक, उत्पादक संस्था व्यवस्थापक, भौगोलिक संकेत (GI) व्यवस्थापक, इन्क्युबेशन सेंटर किंवा स्टार्टअप व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, वित्तीय विश्लेषक, डेटा सायंटिस्ट व BI डेव्हलपर, प्रकल्प व्यवस्थापक तसेच वरिष्ठ सांख्यिकी विश्लेषक अशा पदांचा समावेश आहे.
पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| Additional Chief Risk Manager | 2 |
| Risk Manager (विविध प्रकार) | 5 |
| Producer Organization Manager | 1 |
| GI Manager | 1 |
| Incubation/Startup Manager | 1 |
| Senior Consultant | 1 |
| Financial Analyst | 2 |
| Data Scientist & BI Developer | 1 |
| Project Manager (IT) | 2 |
| Senior Statistical Analyst | 1 |
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून CA, MBA, पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, MCA, M.Sc, CFA अशा विविध पात्रता मान्य आहेत. उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव 01 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी
या वरिष्ठ पदांसाठी वेतन अत्यंत आकर्षक असून काही पदांसाठी दरमहा 3.85 लाख रुपये, तर डेटा सायंटिस्ट व BI डेव्हलपर पदासाठी वार्षिक 15 ते 21 लाख रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज प्रक्रिया
सर्व पदांसाठी अर्ज https://nabardsociety.com/ या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन नाबार्डकडून करण्यात आले आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/xWSYa |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/88r50 |
| अधिकृत वेबसाईट | nabardsociety.com |
