NHRC Bharti 2025: राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये प्रेझेंटेटिंग ऑफिसर, डेप्युटी रजिस्ट्रार, रिसर्च ऑफिसर, इन्स्पेक्टर, वरिष्ठ रिसर्च असिस्टंट, प्रोग्रामर असिस्टंट, अकाउंटंट, असिस्टंट लायब्रेरियन, स्टेनो ग्रेड डी आणि कॉन्स्टेबल अशा विविध पदांचा समावेश आहे.
या सर्व पदांसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच सादर करायचा असून, कोणत्याही इतर माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ‘सी’ ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली – 110023 या पत्त्यावर १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा प्रकारे पाठवावेत.
या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट ठेवण्यात आलेली असून, प्रेझेंटेटिंग ऑफिसरसाठी जिल्हा किंवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले किंवा कार्यरत असलेले न्यायिक अधिकारी पात्र असतील. डेप्युटी रजिस्ट्रारसाठी कायद्याची पदवी, रिसर्च ऑफिसरसाठी सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी, तर इन्स्पेक्टरसाठी केंद्रीय किंवा राज्य पोलीस दलात किमान ५ वर्षे सेवा केलेला सब-इन्स्पेक्टर असणे आवश्यक आहे.
अन्य पदांसाठीही संबंधित विषयातील पदवी, डिप्लोमा किंवा अनुभवाची गरज असून, मूळ जाहिरातीत यासंबंधी तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. वेतनश्रेणीही पदानुसार ठरवण्यात आली असून ती लेव्हल 3 पासून लेव्हल 14 पर्यंत आहे. म्हणजेच, कॉन्स्टेबलसाठी ₹21,700 पासून तर प्रेझेंटेटिंग ऑफिसरसाठी ₹2,18,200 पर्यंत वेतनाची तरतूद आहे.
या भरती प्रक्रियेमुळे कायदा, समाजशास्त्र, संगणक, ग्रंथालय शास्त्र आणि सुरक्षा क्षेत्रातील पात्र उमेदवारांना केंद्रीय शासनाच्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अधिकृत संकेतस्थळ https://nhrc.nic.in वर भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि मूळ PDF जाहिरात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून ही संधी साधावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/ijRV7 |
| अधिकृत वेबसाईट | https://nhrc.nic.in/ |
