सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच(SECI Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, उप व्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी (मानव संसाधन आणि प्रशासन), अभियंता (कॉर्पोरेट नियोजन), अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अभियंता आणि उप व्यवस्थापक (सौर) अशा विविध पदांचा समावेश आहे. या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2026 आहे.
SECI ही सौर आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित संस्था असल्याने या भरतीमध्ये अभियांत्रिकी, कायदा, वित्त, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच पदानुसार संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
SECI भरती 2026 मधील पदे : SECI Bharti 2026
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| महाव्यवस्थापक | 01 |
| उप महाव्यवस्थापक | 02 |
| उप व्यवस्थापक | 11 |
| लेखा अधिकारी | 01 |
| अधिकारी (मानव संसाधन आणि प्रशासन) | 01 |
| अभियंता (कॉर्पोरेट नियोजन) | 01 |
| अधिकारी (कायदेशीर) | 01 |
| वरिष्ठ अभियंता | 11 |
हेही वाचा : MD Pawar People’s Co-Op Bank Bharti 2026 | एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँकेत 11 पदांसाठी भरती; शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई पदांची संधी
Indian Overseas Bank Bharti 2026 | ओव्हरसीज बँक 25 पदांची भरती; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
महाव्यवस्थापक पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, सिव्हिल, मेकॅनिकल, सोलर, पॉवर इंजिनिअरिंग, एनर्जी इंजिनिअरिंग किंवा रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी आणि किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. या पदासाठी किमान 22 वर्षांचा अनुभव मागविण्यात आला आहे.
उप व्यवस्थापक पदांसाठी संबंधित शाखेतील B.E./B.Tech पदवीसह पदानुसार किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. लेखा अधिकारी पदासाठी CA, CMA किंवा फायनान्समधील MBA पात्रता नमूद करण्यात आली आहे. मानव संसाधन व प्रशासन अधिकारी पदासाठी HRM किंवा संबंधित विषयातील MBA/PGDBM आवश्यक आहे. कायदा अधिकारी पदासाठी 3 वर्षांचा LLB किंवा 5 वर्षांचा इंटिग्रेटेड LLB अभ्यासक्रम आवश्यक आहे.
निश्चित मुदतीच्या पदांमध्ये वरिष्ठ अभियंता, उप व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल/सिव्हिल), उप व्यवस्थापक (सोलर – पॉलिसी अँड रेग्युलेटरी), उप व्यवस्थापक (सोलर – कमिशनिंग) आणि उप व्यवस्थापक (सोलर – रूफटॉप) यांचा समावेश आहे. या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील B.E./B.Tech किंवा आवश्यकतेनुसार LLB आणि पदानुसार अनुभव आवश्यक आहे.
अर्ज शुल्क नियमित कार्यकारी पदांसाठी 1,000 रुपये, तर निश्चित मुदतीच्या कार्यकारी पदांसाठी 500 रुपये आहे. SC, ST, माजी सैनिक आणि PwBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2026 असून, अधिक माहितीसाठी SECI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/Snfyvikxt |
| ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/WiIRbrrcs |
| अधिकृत वेबसाईट | https://www.seci.co.in/ |
