SGBAU Amravati Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक तसेच विविध शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दोन स्वतंत्र भरती प्रक्रियांमध्ये एकूण ७७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
श्री कानिफनाथ सायन्स कॉलेज, कारंजा (खेर्डा), जि. वाशिम येथे ६२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्राचार्य, विविध विषयांचे सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, BBA आणि BCA विभागातील पदांसह कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर आणि शिपाई पदांचा समावेश आहे.
SGBAU Amravati Bharti 2026
| पद | जागा |
|---|---|
| प्राचार्य | १ |
| सहायक प्राध्यापक व इतर शिक्षक पदे | ४५ |
| शिक्षकेतर कर्मचारी | १६ |
| एकूण | ६२ |
या भरतीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. प्राध्यापक पदांसाठी Ph.D./NET/SET, तर काही शिक्षकेतर पदांसाठी पदवी किंवा १२वी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
दरम्यान, अमरावती येथील दत्त विद्या महाविद्यालयात प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक अशा १५ पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०२६ आहे.
दोन्ही भरतींसाठी उमेदवारांनी संबंधित जाहिरात आणि पात्रता काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा. अधिकृत माहितीसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची वेबसाइट पाहावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/QOti1 |
| अधिकृत वेबसाईट | https://www.sgbau.ac.in/ |
| PDF जाहिरात | https://lnk.ua/XfwI4AXFW |
| अधिकृत वेबसाईट | https://www.sgbau.ac.in/ |
