सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Sindhudurg DCC Bank Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उपमहाव्यवस्थापक आणि सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापक या पदांसाठी एकूण 5 जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 अशी आहे.

या भरतीमध्ये उपमहाव्यवस्थापक-लेखा/लेखापरीक्षण व तपासणी, उपमहाव्यवस्थापक–संगणक तसेच सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापक अशा विविध पदांचा समावेश आहे. उपमहाव्यवस्थापक-लेखा/लेखापरीक्षण व तपासणी या पदांसाठी सीए पदवीसह सीओआयआयबी, CPCB Level II, डीसीबीएम किंवा बँकिंग क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव व संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. तर उपमहाव्यवस्थापक (संगणक) पदाकरिता बीई (कॉम्प्युटर), एमसीए किंवा समतुल्य पात्रतांसह आयटी किंवा बँकिंग क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी चालते.

बँकेने वयोमर्यादाही स्पष्ट केल्या असून उपमहाव्यवस्थापक पदांसाठी कमाल वय 45 वर्षे, तर सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापक पदासाठी 38 वर्षे निश्चित केली आहेत. सर्व अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण, अचूक माहिती देऊन अर्ज सादर करणे बंधनकारक असून अपूर्ण अर्ज सरळ नाकारले जाणार आहेत.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय,
सिंधुदुर्गनगरी, प्लॉट नं. 32, नवनगर विकास प्राधिकरण,
मु.पो. ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – 416812

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
उपमहाव्यवस्थापक – लेखा/लेखापरीक्षण व तपासणी02
उपमहाव्यवस्थापक – संगणक01
सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापक02
एकूण05

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापक – लेखा/लेखापरीक्षण व तपासणीसीए, COIIB/CPCB Level II/DCBM, बँकिंगचा 2 वर्षांचा अनुभव, संगणकीय ज्ञान
उपमहाव्यवस्थापक – संगणकBE (Computer)/MCA/COIIB/CPCB Level II/DCBM, IT/Banking क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव
सुवर्ण लेखापरिक्षक/मुल्यमापककोणत्याही शाखेचा पदवीधर

सविस्तर सूचना व पात्रतेचा तपशील बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Sindhudurg DCC Bank Bharti 2025

PDF जाहिरात -1https://shorturl.at/RTNXR
PDF जाहिरात -2https://shorturl.at/UTFDC
अधिकृत वेबसाईटhttps://www.sindhudurgdcc.com/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा