Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत विद्यापीठाने वाढवली असून आता पात्र उमेदवारांना २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया यापूर्वी तीन वेळा जाहिरात करूनही रखडली होती. यापूर्वी ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर अशी मुदत देण्यात आली होती; मात्र इच्छुकांना आणखी संधी देत विद्यापीठाने नव्या तारखा जाहीर केल्या.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची छायांकित प्रत आणि आवश्यक कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भरतीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशा एकूण १११ जागांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार राहणार असून सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे.
Pune University Vacancy 2025 – जागा विवरण
पदाचे नाव
पदसंख्या
प्राध्यापक
32
सहयोगी प्राध्यापक
32
सहायक प्राध्यापक
47
एकूण
111
अर्ज प्रक्रिया – Pune University Bharti 2025
अर्ज पद्धत: ऑनलाइन + ऑफलाइन
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: २१ डिसेंबर २०२५
ऑफलाइन कागदपत्र सादरीकरणाची अंतिम तारीख: २६ डिसेंबर २०२५
पुणे विद्यापिठात विद्याशाखा अधिष्ठाता व परीक्षा संचालक पदांसाठीही अर्ज सुरू
याशिवाय, विद्यापीठाने “विद्याशाखा अधिष्ठाता” आणि “परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक” या पदांसाठी एकूण ५ जागांची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अर्जाची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२५ असून अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
Pune University Vacancy – अधिष्ठाता व संचालक पदे
पदाचे नाव
पदसंख्या
विद्याशाखा अधिष्ठाता
04
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ
01
शैक्षणिक पात्रता
पद
पात्रता
विद्याशाखा अधिष्ठाता
Ph.D. पदवी
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ
मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 55% गुणांची पदवी / UGC 7-point scale equivalent