VNMKV Parbhani Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून एकूण १९७ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, कृषी सहायक, वीजतंत्री, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर आणि शिपाई अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे. परभणी येथे ही नोकरी राहणार असून उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी १००० रुपये, तर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांनी ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या भरतीमध्ये वेतनश्रेणीसुद्धा पदानुसार आकर्षक ठेवण्यात आली आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदासाठी S-13 मॅट्रिक्सनुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये, तर उप अवेक्षक, कृषी सहायक आणि वीजतंत्री पदांसाठी S-8 मॅट्रिक्सनुसार २५,५०० ते ८१,१०० रुपये वेतन दिले जाणार आहे. कनिष्ठ लिपिक आणि वाहन चालकांसाठी S-6 वेतनश्रेणी असून १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतनमान आहे. प्रयोगशाळा सेवक व शिपाई पदांसाठी S-1 मॅट्रिक्सनुसार १५,००० ते ४७,६00 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह पात्रतेची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. अपूर्ण अर्ज सरळ नाकारले जाणार असल्याची स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२५ आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील संबंधित PDF जाहिरात पाहावी. ही भरती प्रक्रिया जाहीर झाल्याने मराठवाड्यातील अनेक तरुण उमेदवारांसाठी नोकरीची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/YxjGd |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/I0C0k |
| अधिकृत वेबसाईट | https://www.vnmkv.ac.in |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर” पदांच्या 04रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025आहे.
- पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर
- पदसंख्या – 04जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रमुख, फलोत्पादन विभाग, व्हीएनएमकेव्ही, परभणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.vnmkv.ac.in/
VNMKV Parbhani Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| असिस्टंट प्रोफेसर | 04 |
Educational Qualification For VNMKV Parbhani Recruitment 2025

Salary Details For VNMKV Parbhani Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| असिस्टंट प्रोफेसर | Consolidated Rs. 45,000/- per month |
How To Apply For VNMKV Parbhani Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/JWRrR |
| अधिकृत वेबसाईट | https://www.vnmkv.ac.in/ |
