VNMKV Parbhani Bharti 2026: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 197 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2026 आहे. ही भरती कृषी विद्यापीठाच्या विविध कार्यालयीन, तांत्रिक व सहाय्यक आस्थापना विभागासाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क तसेच अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीतून पडताळून अर्ज सादर करावा.
या भरतीमध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उप अवेक्षक, कृषी सहायक, वीजतंत्री, ग्रंथालय सहायक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण परभणी असेल. उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
पदनिहाय जागा
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| कनिष्ठ संशोधन सहाय्यक | 17 |
| उप अवेक्षक | 02 |
| कृषी सहायक | 63 |
| वीजतंत्री | 04 |
| ग्रंथालय सहायक | 01 |
| कनिष्ठ लिपिक | 34 |
| वाहन चालक | 07 |
| कृषी यंत्र चालक | 01 |
| प्रयोगशाळा परिचर | 07 |
| प्रयोगशाळा सेवक | 19 |
| ग्रंथालय परिचर | 02 |
| शिपाई | 40 |
| एकूण | 197 |
वेतनश्रेणी (Pay Scale)
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासनमान्य वेतनश्रेणी लागू राहणार आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदासाठी S-13 (Rs 35400 ते 112400), तर उप अवेक्षक, कृषी सहायक आणि वीजतंत्री पदांसाठी S-8 (Rs 25500 ते 81100) वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. ग्रंथालय सहायक व कृषी यंत्र चालक पदांसाठी S-7 (Rs 21700 ते 69100) वेतनश्रेणी, तर कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर आणि ग्रंथालय परिचर पदांसाठी S-6 (Rs 19900 ते 63200) वेतनश्रेणी लागू आहे. तसेच प्रयोगशाळा सेवक व शिपाई पदांसाठी S-1 (Rs 15000 ते 47600) वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क
अर्ज सादर करताना उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे.
- अराखीव (खुला) प्रवर्ग : Rs 1000/-
- मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ प्रवर्ग : Rs 900/-
अर्ज प्रक्रिया
सर्व पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये पात्रता, शैक्षणिक माहिती व आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूक भरावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात. भरती संदर्भातील अधिकृत अपडेट्स आणि अर्ज लिंक मिळविण्यासाठी उमेदवारांनी विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट www.vnmkv.ac.in येथे भेट द्यावी तसेच उपलब्ध PDF जाहिरात जरूर पाहावी.
| शुद्धिपत्रक | https://shorturl.at/YxjGd |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/YxjGd |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/I0C0k |
| अधिकृत वेबसाईट | https://www.vnmkv.ac.in |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर” पदांच्या 03रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2026 आहे.
- पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, कृषी विभाग अर्थशास्त्र, कृषी महाविद्यालय, व्हीएनएमकेव्ही, परभणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2026
- अधिकृत वेबसाईट – https://www.vnmkv.ac.in/
| PDF जाहिरात | https://shorturl.at/YxjGd |
| अधिकृत वेबसाईट | https://www.vnmkv.ac.in |
