Jalsampada Vibhag Bharti 2026 | मोठी खुशखबर! जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगाभरती; नवीन परिपत्रक जाहीर

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर मेगाभरती(Jalsampada Vibhag Bharti 2026)होण्याची तयारी सुरू झाली असून यासंदर्भातील महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील सुमारे 14 हजार पदांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय विभागासाठी 41 हजार पदांच्या नवीन आकृतिबंधालाही मंजुरी देण्यात आली असून भरती प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशासकीय हालचाली अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांसाठी नवीन आकृतिबंध निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वित्त विभागाच्या निर्देशानुसार मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत आणि रिक्त पदांची अचूक माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिनस्त कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संवर्गातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती उच्चस्तरीय सचिव समितीसमोर मांडण्यात येणार असल्याने संबंधित कार्यालयांनी अचूक माहिती सादर करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. विविध विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना त्यांचे सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार भरती प्रक्रियेबाबत सकारात्मक असून आवश्यकतेनुसार सेवा प्रवेश नियम आणि विभागीय रचना निश्चित करण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी संघटनांनी मात्र या भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित भरती करण्याची भूमिका मांडली आहे.

राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने 70 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 20 हजार पदे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेरील विविध पदांचाही समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्य, पात्रता, सेवा प्रवेश नियम आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जलसंपदा विभागातील रिक्त पदांबाबत माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील 1,534 पदे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या संवर्गातील 278 पदे आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गातील 142 पदे डिसेंबर 2025 अखेर रिक्त होती. याशिवाय विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांवरही मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकार अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या उत्तरानुसार सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत नियमितपणे विभागाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात 75 हजार नोकरभरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक म्हणजे एक लाखांहून अधिक पदांची भरती झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. आता सरकारच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागाला सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून जलसंपदा विभागातील भरतीला देखील गती मिळत आहे.

यापूर्वी जलसंपदा विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेरील गट ‘ब’ (अराजपत्रित) आणि गट ‘क’ संवर्गातील 14 संवर्गांतील एकूण 4,497 रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीतील उमेदवारांच्या शिफारस याद्या आणि प्रतीक्षा याद्या वेळोवेळी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या प्रस्तावित मेगाभरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, स्टेनो, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य सहाय्यक तसेच विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, बारावी, आयटीआय तसेच इतर पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी ठरू शकते.

भरतीचा संभाव्य तपशील : Jalsampada Vibhag Bharti 2026

बाबमाहिती
विभागमहाराष्ट्र जलसंपदा विभाग
संभाव्य रिक्त पदे14,000 पेक्षा अधिक
मंजूर नवीन आकृतिबंध41,000 पदे
भरतीचा प्रकारमेगाभरती (अपेक्षित)
अर्ज प्रक्रियाऑनलाइन (अधिकृत अधिसूचनेनंतर)
अधिकृत संकेतस्थळwww.wrd.maharashtra.gov.in

हेही वाचा : Kolhapur Anganwadi Bharti 2026 | 12वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! कोल्हापूर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 सुरू, 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

MECL Nagpur Bharti 2026 | सरकारी नोकरीची मोठी संधी! MECL नागपूरमध्ये भरती; 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

संभाव्य पदे

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • लिपिक
  • कनिष्ठ सहाय्यक
  • स्टेनो
  • स्थापत्य सहाय्यक
  • इतर तांत्रिक व अतांत्रिक पदे

संभाव्य शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ अभियंता: सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी.
  • लिपिक: बारावी उत्तीर्ण तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र.
  • सहाय्यक पदे: संबंधित व्यवसायातील ITI किंवा समतुल्य पात्रता.

संभाव्य निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी किंवा टायपिंग टेस्ट (लागू असल्यास)
  • काही पदांसाठी मुलाखत
  • अंतिम गुणवत्ता यादी

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
  • भरतीसंबंधी सर्व अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासत राहावी.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड किंवा सादर करावी.
  • प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या साधारण दहा दिवस आधी प्रसिद्ध केले जाईल.

राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जलसंपदा विभागाची ही प्रस्तावित मेगाभरती मोठी संधी मानली जात आहे. भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात, अभ्यासक्रम, अर्जाची तारीख आणि इतर तपशील जाहीर होताच उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून माहिती तपासून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

या संदर्भातील परिपत्रक PDF डाउनलोड करा 


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा