SSC JE Bharti 2026 | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची भरती; १,७४८ जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

कनिष्ठ अभियंता म्हणून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी(SSC JE Bharti 2026)महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अर्थात SSC अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेतील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण १ हजार ७४८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात आणि त्यामध्ये दिलेले पात्रतेचे निकष काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

भरतीचा तपशील : SSC JE Bharti 2026

घटकमाहिती
पदाचे नावकनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
पदसंख्या१,७४८
शैक्षणिक पात्रतासंबंधित शाखेतील Engineering Degree/Diploma
वयोमर्यादा१८ ते ३२ वर्षे
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्जाची अंतिम तारीख२२ सप्टेंबर २०२६
वेतनLevel-6, ₹35,400 ते ₹1,12,400

हेही वाचा : Tribal Ashram School Bharti 2026 | आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी संधी; ‘पवित्र’ पोर्टलवरून २,४२१ पदे भरणार

Sahayak Pradhyapak Bharti 2026 | सहायक प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! ५ हजार १२ रिक्त पदे भरणार; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

या भरतीसाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील Engineering Degree किंवा Diploma असणे आवश्यक आहे. मात्र नेमकी शैक्षणिक पात्रता पदानुसार लागू असल्याने उमेदवारांनी मूळ PDF जाहिरात तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे देण्यात आली आहे.

वेतनाचा विचार केला तर कनिष्ठ अभियंता पदासाठी Level-6 वेतनश्रेणी असून ₹३५ हजार ४०० ते ₹१ लाख १२ हजार ४०० रुपये अशी वेतनश्रेणी देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC, ST, PwBD, ESM आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पहिल्या दुरुस्तीला २०० रुपये आणि दुसऱ्या दुरुस्तीला ५०० रुपये शुल्क असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या Registration Number आणि Password च्या सहाय्याने लॉगिन करून ‘आता अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करावा. त्यानंतर वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि शैक्षणिक इतिहास यासह आवश्यक माहिती भरावी.

अर्जामध्ये आवश्यक आकारमान आणि फॉरमॅटमध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. त्यानंतर लागू असलेले अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरता येईल.

अर्जातील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज अंतिमरित्या सबमिट करावा. अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो. त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती पुन्हा तपासणे महत्त्वाचे आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज आणि भरतीसंदर्भातील सविस्तर सूचना SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/7OSzcbnWS
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/noJZ9
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा