कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली(High Court circuit bench Recruitment) आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी विविध संवर्गांतील तब्बल ४५९ पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदांच्या निर्मितीसोबतच त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार स्थापन करण्यात आले होते आणि १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित झाले. सुरुवातीच्या काळात सर्किट बेंचच्या कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथील खंडपीठांमधील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत होत्या. त्यानंतर सर्किट बेंचसाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन विविध संवर्गांतील ४५९ पदांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
या ४५९ पदांमध्ये गट ‘अ’, गट ‘ब’, गट ‘क’ आणि गट ‘ड’ या चारही संवर्गांतील पदांचा समावेश आहे. गट ‘अ’ मध्ये एकूण २० पदे, गट ‘ब’ मध्ये ३५ पदे, गट ‘क’ मध्ये २७६ पदे आणि गट ‘ड’ मध्ये १२८ पदे आहेत.

पदांचा संवर्गनिहाय तपशील : High Court circuit bench Recruitment
| संवर्ग | प्रमुख पदे | एकूण पदे |
|---|---|---|
| गट ‘अ’ | प्रबंधक, उपप्रबंधक, सहायक प्रबंधक, सहायक प्रबंधक (आयटी), ग्रंथपाल, उपमुख्य अनुवादक व दुभाषी आदी | 20 |
| गट ‘ब’ | कक्ष अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, वरिष्ठ भाषांतरकार व दुभाषी | 35 |
| गट ‘क’ | लघुलेखक, उच्चश्रेणी कक्ष अधिकारी, निम्नश्रेणी लघुलेखक, सहायक कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी, लिपिक, वाहनचालक | 276 |
| गट ‘ड’ | हवालदार, चोपदार, फायलर, पुस्तक बांधणीकर, नाईक, झेरॉक्स ऑपरेटर, उद्वाहनचालक, शिपाई/हमाल, पहारेकरी, स्वयंपाकी, माळी, सफाईगार | 128 |
| एकूण | 459 |
हेही वाचा : Naval Dockyard Mumbai Bharti 2026 | ०८वी, १०वी उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबईत अप्रेंटिसच्या 283 जागांसाठी भरती
Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वे अंतर्गत 66 पदांकरिता भरती; सहाय्यक लोको पायलट पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
गट ‘अ’ मध्ये प्रबंधक २, उपप्रबंधक ४, मा. मुख्य न्यायमूर्ती यांचे अतिरिक्त सचिव १, सहायक प्रबंधक ९, सहायक प्रबंधक (आयटी) १, उपमुख्य अनुवादक व दुभाषी १, राजशिष्टाचार अधिकारी नि कोर्ट किपर १ आणि ग्रंथपाल १ अशी पदे आहेत. गट ‘ब’ मध्ये कक्ष अधिकारी ३२, सॉफ्टवेअर इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर आणि वरिष्ठ भाषांतरकार व दुभाषी अशी पदे आहेत.
गट ‘क’ मध्ये लिपिक पदाची १७२ जागा, उच्चश्रेणी कक्ष अधिकारी ८०, तसेच लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, सहायक कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी आणि वाहनचालक पदांचा समावेश आहे. गट ‘ड’ मध्ये शिपाई/हमाल पदाच्या ७० जागांसह हवालदार, चोपदार, फायलर, पुस्तक बांधणीकर, नाईक, झेरॉक्स ऑपरेटर, उद्वाहनचालक, पहारेकरी, स्वयंपाकी, माळी आणि सफाईगार या पदांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मंत्रिमंडळाने सध्या पदनिर्मितीला आणि संबंधित खर्चाला मंजुरी दिली आहे; प्रत्यक्ष भरतीची जाहिरात आणि अर्जाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच पात्रता, अर्ज पद्धती, शुल्क, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासून अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ४५९ पदांच्या मंजुरीमुळे कोल्हापूर सर्किट बेंचसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे.
