महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहिल्यानगर) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या दोन स्वतंत्र भरती जाहिरातींच्या माध्यमातून एकूण 44 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, क्षेत्रीय कामगार तसेच यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) आणि यंग प्रोफेशनल-II (आयटी) या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यंग प्रोफेशनल-II पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 42 हजार रुपये निश्चित मानधन मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना पदांनुसार ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2026 : 42 पदांसाठी संधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या DBT हरभरा नेटवर्क मिशन प्रकल्पांतर्गत एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये प्राचार्य, व्याख्याता, प्रक्षेत्र अधिकारी, (कृषि) सहाय्यक, आरोग्य अधिकारी, क्रीडा अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक ग्रंथपाल, शिपाई, वाहन चालक, माळी, लिपिक या पदांचा समावेश आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही रोजगाराची संधी आहे.
या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज मुख्य अन्वेषक, डीबीटी (DBT) हरभरा नेटवर्क मिशन प्रकल्प, कडधान्य सुधारणा प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पिन कोड 413722, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र या पत्त्यावर पाठवायचा आहे. तसेच ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्यासाठी ssgmgvpmirajgaon@gmail.com हा ई-मेल पत्ता देण्यात आला आहे.
भरतीचा तपशील – MPKV Recruitment 2026
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्थेचे नाव | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी |
| पदाचे नाव | वरिष्ठ संशोधन सहकारी आणि क्षेत्रीय कामगार |
| एकूण पदसंख्या | 42 |
| शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
| नोकरीचे ठिकाण | राहुरी, अहिल्यानगर |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन / ई-मेल |
| ई-मेल | ssgmgvpmirajgaon@gmail.com |
| अंतिम तारीख | 30 नोव्हेंबर 2026 |
यंग प्रोफेशनल-II पदांसाठीही भरती
महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत आणखी एका स्वतंत्र भरती जाहिरातीद्वारे यंग प्रोफेशनल-II या पदांच्या दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) आणि यंग प्रोफेशनल-II (आयटी) या दोन पदांचा समावेश आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे.
या भरतीसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तसेच आयटी क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) | 01 |
| यंग प्रोफेशनल-II (आयटी) | 01 |
| एकूण | 02 |
शैक्षणिक पात्रता काय असावी?
यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) या पदासाठी उमेदवाराकडे कृषी कीटकशास्त्र (Agriculture Entomology) किंवा वनस्पती रोगशास्त्र (Plant Pathology) या विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
तर यंग प्रोफेशनल-II (आयटी) पदासाठी संगणक अनुप्रयोग, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या संबंधित विषयांमध्ये किमान 60 टक्के गुणांसह पदवी आणि संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
याशिवाय, वरील संबंधित विषयांमध्ये मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (MCA), माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारही पात्र असतील.
दरमहा 42 हजार रुपये मानधन
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या दोन्ही यंग प्रोफेशनल-II पदांवरील उमेदवारांना दरमहा 42 हजार रुपये निश्चित मानधन दिले जाणार आहे. दोन्ही पदांसाठी वेतन समान ठेवण्यात आले आहे.
| पदाचे नाव | मासिक मानधन |
|---|---|
| यंग प्रोफेशनल-II (वनस्पती संरक्षण) | 42,000 रुपये |
| यंग प्रोफेशनल-II (आयटी) | 42,000 रुपये |
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
यंग प्रोफेशनल-II पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज मुख्य अन्वेषक, ‘एआय (AI)-आधारित पूर्वसूचना आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालीचा विकास’ तसेच ‘यूएव्ही (UAV)-आधारित अचूक कीड व्यवस्थापन धोरणे’, कृषी अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413722, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र) या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्जामध्ये उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अनुभव यांचा तपशील व्यवस्थित नमूद करावा. अर्ज सादर करताना संबंधित पदासाठी दिलेल्या सर्व पात्रता अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज पाठविण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील सूचना वाचणे महत्त्वाचे आहे.
दोन्ही भरती प्रक्रियांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भातील अधिक माहिती, अर्जाचा नमुना, पात्रता आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिकृत संकेतस्थळ: https://mpkv.ac.in/
| PDF जाहिरात | https://shorturl.at/3Zl6i |
| अधिकृत वेबसाईट | https://mpkv.ac.in/ |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/xz5U7 |
| अधिकृत वेबसाईट | https://mpkv.ac.in/ |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर अंतर्गत “तरुण व्यावसायिक- I” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर भरती २०२६
- पदाचे नाव – तरुण व्यावसायिक- I
- पदसंख्या – 01
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहिल्यानगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/
MPKV Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| तरुण व्यावसायिक- I | 01 |
Educational Qualification For MPKV Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तरुण व्यावसायिक- I | Degree in the Agricultural Science branch from a recognised university. Preference will be given to holders of the highest educational qualification and experience. |
Salary Details For MPKV Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| तरुण व्यावसायिक- I | ₹30,000 /month |
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
| PDF जाहिरात | https://shorturl.at/ziXeZ |
| अधिकृत वेबसाईट | https://mpkv.ac.in/ |
