महिना 47 हजार पगार.. जिल्हा न्यायालय चंद्रपूरमध्ये ‘सफाईगार’ पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा | Chandrapur District Court Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

चंद्रपूर | जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सफाईगार पदासाठी भरतीची (Chandrapur District Court Bharti 2025) प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालय प्रशासनाने एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

भरतीविषयक माहिती: Chandrapur District Court Bharti 2025

सफाईगार पदासाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसंदर्भात मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पदासाठी निश्चित करण्यात आलेली वेतनश्रेणी S-1 (₹15,000 ते ₹47,600) इतकी आहे.

रिक्त पदांचा तपशील:

पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी
सफाईगार05₹15,000 – ₹47,600 (S-1)

अर्ज प्रक्रिया: Chandrapur District Court Recruitment 2025

उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर १० जून २०२५ पर्यंत पाठवावा:

पत्ता:
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टँड समोर, चंद्रपूर – ४४२४०१.

अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत. अपूर्ण अर्ज किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज सरसकट रद्द करण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची सविस्तर सूचना आणि मूळ जाहिरात https://chandrapur.dcourts.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही संधी स्थानिक पातळीवरील उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे, विशेषतः ज्यांना शासकीय नोकरीत प्रवेश घ्यायचा आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/GuUbP
अधिकृत वेबसाईटhttps://chandrapur.dcourts.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा