पदवीधरांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती; 4500 रिक्त जागांसाठी संधी | Central Bank of India Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी एकूण 4500 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये केली जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहे. उमेदवाराकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा २० ते २८ वर्षांदरम्यान ठेवण्यात आली आहे.

राज्यनिहाय जागा (काही निवडक उदाहरणे):

राज्याचे नावपदसंख्या
महाराष्ट्र586
उत्तर प्रदेश580
मध्य प्रदेश459
बिहार433
गुजरात305
पश्चिम बंगाल315
राजस्थान170
तामिळनाडू202
पंजाब142
दिल्ली (NCT)97
कर्नाटका105

एकूण 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही भरती होणार असून प्रत्येकासाठी जागांची संख्या स्वतंत्र आहे.

महत्त्वाची पात्रता आणि अटी: Central Bank of India Bharti 2025

  • शैक्षणिक पात्रता: भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation).
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे.
  • वेतन: रु. 15,000/- प्रतिमाह.
  • अर्जाची पद्धत: केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज फी:
    • PWBD उमेदवार: ₹400/-
    • SC/ST/सर्व महिला/EWS: ₹600/-
    • इतर सर्व: ₹800/-

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://www.centralbankofindia.co.in/

उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अपूर्ण किंवा अयोग्य माहिती असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात तपासावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/KSVTY
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/FpPKy
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा