SSC MTS Bharti 2025: १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत एकूण १०७५ पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना २६ जून २०२५ रोजी SSC च्या संकेतस्थळावर www.ssc.nic.in प्रकाशित करण्यात आली आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार या दोन्ही पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण ठेवण्यात आली असून, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळामधून मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, MTS साठी १८ ते २५ वर्षे तर हवालदार पदासाठी १८ ते २७ वर्षे वयोमर्यादा आहे.
SSC MTS Bharti 2025
या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “नवीन नोंदणी” करावी. यानंतर, प्राप्त नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील तसेच स्कॅन केलेले पासपोर्ट साइज छायाचित्र व स्वाक्षरी JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹१००/- असून, महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया २४ जुलै २०२५ पर्यंत खुली असणार आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज सादर करून ही शासकीय नोकरीची सुवर्णसंधी गमावू नये. भरतीसंबंधी अधिक माहिती व सविस्तर मार्गदर्शक सूचना SSC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/dbOhn |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fDKS3 |
| अधिकृत वेबसाईट | www.ssc.nic.in |
