गोदरेज कंपनीत १० वी पास उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी; ‘या’ पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहा | Godrej Walk-In Jobs

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Godrej Walk-In Jobs: गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड या देशातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी फक्त १० वी पास आणि ITI किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी चालून आली आहे. गोदरेजकडून विविध तांत्रिक पदांसाठी थेट मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं असून, या मुलाखती ४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील महापे येथील Country Inn & Suites by Radisson या ठिकाणी पार पडणार आहेत.

Godrej Walk-In Jobs

या भरतीमध्ये मुख्यतः मशीन ऑपरेटर, क्वालिटी अँड स्पेशल प्रोसेस, तसेच फिटर्स यांसारख्या कुशल पदांचा समावेश आहे. उपलब्ध जागांमध्ये CNC Milling/VMC, CNC Turning, Turnmill, EDM/Wirecut, Cylindrical Grinder, Hydraulic Press Operators तसेच NDT Inspector, QC Inspector, CMM Programmer, Lab Technician, Electroplater, Spray Painter, TIG/MIG Welder, Assembly Fitter, Testing Fitter, Bench Fitter, Maintenance Fitter अशा प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार किमान १० वी पास असावा आणि त्याचबरोबर ITI (NCVT) किंवा मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रं, अनुभव प्रमाणपत्रं, पगार स्लिप व ओळखपत्राची मूळ प्रत व झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. जे उमेदवार ४ जुलै रोजी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाहीत, त्यांनी आपले बायोडेटा आणि कागदपत्रं पुढील ७ दिवसांच्या आत hrd@godrej.com या ईमेलवर पाठवावीत.

गोदरेजसारख्या नावाजलेल्या कंपनीत स्थिर व सुरक्षित नोकरी मिळवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर मुलाखतीसाठी तयारी करावी.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा