नोकरीची सुवर्णसंधी: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत 500 रिक्त जागांकरिता भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Oriental Insurance Company Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Oriental Insurance Company Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (Oriental Insurance Company Ltd.) भारतभरात ‘सहाय्यक’ पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण 500 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही संधी पदवीधर तरुणांसाठी खास असून सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

भरती प्रक्रेचे संपूर्ण अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने https://orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटवरून स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2025 असून या तारखेपर्यंत अर्ज सादर न झाल्यास उमेदवाराची संधी हुकू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

शैक्षणिक पात्रता: Oriental Insurance Company Bharti 2025

या भरतीसाठी उमेदवार किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज शुल्क:

सामान्य (General), आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000 इतके आहे.
तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त ₹250 इतके ठेवण्यात आले आहे.

अर्जाची प्रक्रिया:

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  2. तेथे भरतीविषयी सविस्तर माहिती असलेली मूळ जाहिरात (PDF) वाचावी.
  3. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अचूक भरावी.
  4. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कोणतीही ऑफलाईन अर्ज प्रक्रिया नाही.
  5. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन सुरक्षित ठेवावी.

निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रियेबाबत कंपनीकडून लवकरच तपशीलवार माहिती जाहीर करण्यात येईल. साधारणतः अशा भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, कौशल्य चाचणी (जर लागु असेल) आणि अंतिम मुलाखत असे टप्पे असू शकतात.

अधिक माहिती व संपर्क:

सर्व अपडेट्स, शंका निरसन आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी https://orientalinsurance.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/7kEjC
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/VCV11
अधिकृत वेबसाईटhttps://orientalinsurance.org.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा