राष्ट्रीय शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 96 रिक्त जागा; नोकरीची संधी चुकवू नका| National Education Society Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती (National Education Society Bharti 2025) जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रगती कला व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर अशा पदांसाठी एकूण 96 जागा भरण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे आयोजन सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

या भरतीत प्राचार्यांची 4, प्राध्यापकांची तब्बल 80 आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 12 जागांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे, असे संस्थेने आवाहन केले आहे.

National Education Society Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
प्राचार्य04
प्राध्यापक80
शिक्षकेतर पदे12
एकूण96

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार असून इच्छुकांनी अधिकृत जाहिरात वाचून आवश्यक पात्रता तपासावी, असा सल्ला देण्यात आला आहे. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवासभत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण – प्रगती कला व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : nationaleducationsociety.org

PDF जाहिरातhttps://shorturl.at/gcGwI
अधिकृत वेबसाईटnationaleducationsociety.org

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा