AIIMS Nagpur Recruitment 2025 | 123 रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

AIIMS Nagpur Recruitment 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध प्राध्यापक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी एकूण 116 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 अशी आहे.

या भरतीत प्राध्यापकांच्या 10, अतिरिक्त प्राध्यापकांच्या 9, सहयोगी प्राध्यापकांच्या 15 तर सहाय्यक प्राध्यापकांच्या तब्बल 82 जागा उपलब्ध आहेत.

पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी (7वा वेतन आयोग)
प्राध्यापक10Level-14A (₹168900–220400)
अतिरिक्त प्राध्यापक09Level-13A2+ (₹148200–211400)
सहयोगी प्राध्यापक15Level-13A1+ (₹138300–209200)
सहाय्यक प्राध्यापक82Level-12 (₹101500–167400)
एकूण116

AIIMS Nagpur Recruitment 2025

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही MBBS किंवा त्यासमान वैद्यकीय पदवी (भारताच्या मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1956 किंवा नॅशनल मेडिकल कमिशनमार्फत मान्यता प्राप्त) अशी असावी. अर्जासाठी वयोमर्यादा 58 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्क :

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्ग – रु. 2000/-
  • अनुसूचित जाती/जमाती – रु. 500/-
  • अपंग उमेदवार, प्रतिनियुक्तीवरील उमेदवार व करार आधारावरील निवृत्त प्राध्यापक – शुल्क नाही

ऑनलाइन अर्जाची सुविधा 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून 29 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी AIIMS नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरील ( aiimsnagpur.edu.in ) सविस्तर सूचना नक्की वाचाव्यात.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/bqKZG
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/YPEFR
अधिकृत वेबसाईटhttps://aiimsnagpur.edu.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा