Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) अशा एकूण 3 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2025 आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखत त्याच दिवशी ठाणे महानगरपालिका भवन येथे घेण्यात येणार आहे.
ही पदे आरोग्य विभागातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता व किमान 1 वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. CQAC पदासाठी महिन्याकाठी ₹35,000, तर PHM पदासाठी ₹32,000 इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे. मूळ जाहिरात व आवश्यक सूचनांसाठी उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Thane Municipal Corporation Vacancy 2025 – पदांची माहिती
| पदाचे नाव | पद संख्या | पात्रता | वेतन |
|---|---|---|---|
| शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC) | 01 | MBBS अथवा आरोग्य क्षेत्रातील पदवी + MPH/MHA/MBA (Health care) + किमान 1 वर्ष अनुभव | ₹35,000/- प्रतिमहिना |
| सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | 02 | MBBS किंवा Health Graduate/B.Sc Nursing + MPH/MHA/MBA (Health care) + किमान 1 वर्ष अनुभव | ₹32,000/- प्रतिमहिना |
मुलाखत व अर्ज प्रक्रिया – Thane Mahanagarpalika Bharti 2025
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जात सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे द्यावी; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- मुलाखतीचा पत्ता:
ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – 400602 - मुलाखतीची तारीख: 5 डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट: https://thanecity.gov.in/
| PDF जाहिरात | https://shorturl.at/qPg3W |
| अधिकृत वेबसाईट | https://thanecity.gov.in/ |
