UPSC Bharti 2025: संघ लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत परीक्षक (Examiner) आणि उपसंचालक (Deputy Director) या पदांसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2026 आहे.
या भरतीमध्ये Examiner of Trade Marks & Geographical Identifications या पदासाठी सर्वाधिक 100 जागा तर Deputy Director (Examiner Reforms) पदासाठी 2 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक असून वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 1000 रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मध्यमवर्ग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी 500 रुपये इतके आहे.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज प्रक्रिया 13 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. आयोगाने अर्ज सादर करण्यासंबंधी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात किंवा UPSC च्या वेबसाइटचा संदर्भ घ्यावा.
UPSC CGPDTM 2025 – पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| Examiner of Trade Marks (TM) & Geographical Identifications (GI) | 100 |
| Deputy Director (Examiner Reforms) | 02 |
UPSC Bharti 2025
| PDF जाहिरात | https://shorturl.at/t815c |
| ऑनलाईन अर्ज करा (13 डिसेंबर 2025 पासून सुरु) | https://shorturl.at/tpfwq |
| अधिकृत वेबसाईट | https://upsc.gov.in/ |
