आनंदाची बातमी: राज्यात 2 लाख अंगणवाडी सेविका अन् मदतनीसांची भरती; अर्ज करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे गरजेची | Anganwadi Bharti 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Anganwadi Bharti 2026: महाराष्ट्रात २०२६ साली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून, राज्यभरातील स्थानिक महिलांसाठी ही एक महत्त्वाची रोजगार संधी ठरणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, या मेगा भरतीत तब्बल २,२१,००० पेक्षा अधिक पदांचा समावेश असू शकतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

ही भरती महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत राबवली जाणार असून, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशी दोन प्रमुख पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने स्थानिक बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत पार पडू शकते.

शैक्षणिक पात्रतेबाबत पाहता, अंगणवाडी सेविका पदासाठी उमेदवार किमान बारावी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मदतनीस पदासाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. वयोमर्यादा साधारणपणे १८ ते ४५ वर्षे दरम्यान ठेवण्यात येणार असून, शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.

भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला (लागू असल्यास) आणि MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास) यांचा समावेश होतो. स्थानिक रहिवासी महिलांना या भरतीत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे गरजेची – Anganwadi Bharti 2026

  1. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे.
  2. शैक्षणिक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
  3. डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
  4. उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
  5. तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
  6. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
  7. सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  8. सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  9. शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  10. विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  11. अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)
  12. आधार कार्ड

अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट्स तपासणे आवश्यक आहे. यासाठी ICDS Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध होईल. तसेच, संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) कार्यालयातूनही सविस्तर माहिती मिळू शकते.

खालील तक्त्यात भरतीची ठळक माहिती दिली आहे:

बाबमाहिती
विभागमहिला व बालविकास विभाग
पदेअंगणवाडी सेविका, मदतनीस
एकूण जागा२,२१,०००+ (अंदाजे)
शैक्षणिक पात्रतासेविका – १२ वी, मदतनीस – ८ वी/१० वी
वयोमर्यादा१८ ते ४५ वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन / ऑफलाइन

सध्या उपलब्ध माहिती ही विविध बातम्यांवर आधारित असून, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अचूक रिक्त पदसंख्या, अर्जाची अंतिम तारीख आणि इतर तपशील स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आणि नियमितपणे अपडेट्स तपासत राहणे आवश्यक आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा