मेगाभरती: बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी; 914 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू | Bank of India Bharti 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Bank of India Bharti 2026: बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत वर्ष 2026 साठी विविध पदांच्या भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Apprentice), क्रेडिट अधिकारी (Credit Officer – GBO Stream) तसेच फायनान्शियल लिटरसी काउंसेलर (Financial Literacy Counsellor) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

1) प्रशिक्षणार्थी पदासाठी 400 जागांची भरती

बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदासाठी एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2026 आहे.

प्रशिक्षणार्थी भरतीचा तपशील

घटकमाहिती
पदाचे नावप्रशिक्षणार्थी
पदसंख्या400
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी (01.04.2021 ते 01.12.2025 दरम्यान पदवी पूर्ण केलेली असावी)
वेतन₹13,000/- प्रति महिना
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख10 जानेवारी 2026

अर्ज शुल्क

  • PwBD उमेदवार: ₹400/-
  • SC/ST व सर्व महिला उमेदवार: ₹600/-
  • इतर सर्व उमेदवार: ₹800/-
 PDF जाहिरातhttps://shorturl.at/SNjY9
ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/j1jcd

2) क्रेडिट अधिकारी पदासाठी 514 जागांची भरती

बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट अधिकारी (GBO Stream) पदासाठी एकूण 514 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी देखील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 आहे.

पदनिहाय जागा

पदपदसंख्या
क्रेडिट अधिकारी – MMGS-II418
क्रेडिट अधिकारी – MMGS-III60
क्रेडिट अधिकारी – SMGS-IV36
एकूण514

वेतनश्रेणी

पदवेतन
MMGS-II₹64,820 ते ₹93,960
MMGS-III₹85,920 ते ₹1,05,280
SMGS-IV₹1,02,300 ते ₹1,20,940

या पदांसाठी उमेदवारांकडे पदवी, MBA/PGDBM (Finance/Banking), CA, CFA, CMA किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 25 ते 40 वर्षे आहे.

अर्ज शुल्क

  • General/Others: ₹850/-
  • SC/ST/PwBD: ₹175/-
PDF जाहिरातhttps://shorturl.at/HaS7w
ऑनलाईन अर्ज करा (20 डिसेंबर पासून )https://shorturl.at/BDkdn

3) फायनान्शियल लिटरसी काउंसेलर पदासाठी भरती

बँक ऑफ इंडिया अंतर्गत फायनान्शियल लिटरसी काउंसेलर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करायची असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2026 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

विदर्भ अंचल, प्लॉट नं. 2072, दुसरा माळा, सुमती पॅलेस,
महावीर उद्यान समोर, रामनगर, वर्धा – 442001

PDF जाहिरातhttps://shorturl.at/SNjY9 
अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

अर्ज करताना महत्त्वाच्या सूचना – Bank of India Bharti 2026

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील
  • अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अधिकृत माहितीसाठी बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट द्यावी

अधिकृत वेबसाईट: https://bankofindia.co.in/


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा