College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026| कृषी महाविद्यालय कराड आणि मुक्ताईनगर येथे विविध पदांची भरती; प्राध्यापकांसह वैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड(College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026)आणि कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

कृषी महाविद्यालय कराड भरती २०२६ : College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026

यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि ऑपरेटर या पदांसाठी एकूण ६ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ५ जागा असून ऑपरेटर पदासाठी १ जागा आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी संबंधित क्षेत्रातील Ph.D किंवा Master Degree आवश्यक असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या पदासाठी दरमहा २५ हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. ऑपरेटर पदासाठी वैध Excavator 1 Driving Licence आवश्यक असून किमान ६ महिन्यांचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. ऑपरेटर पदासाठी दरमहा २० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रतावेतन
सहाय्यक प्राध्यापक५Ph.D किंवा संबंधित क्षेत्रातील Master Degree₹२५,००० ते ₹४५,०००
ऑपरेटर१वैध Excavator 1 Driving Licence, किमान ६ महिन्यांचा अनुभव वांछनीय₹२०,०००

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे. अर्ज असोसिएट डीन, वायसी शासकीय कृषी महाविद्यालय, कराड मुंढे, पोस्ट-सुपाणे, ता. कराड, जिल्हा सातारा, पिन कोड ४१५ ११४ या पत्त्यावर पाठवायचा आहे. ऑपरेटर पदासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली असून मुलाखत १ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर भरती २०२६ : College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026

कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी एकूण ३ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २ जागा आणि वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी संबंधित क्षेत्रातील Ph.D. किंवा Master’s Degree आवश्यक आहे. या पदासाठी दरमहा २५ हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS किंवा BAMS पात्रता आवश्यक असून या पदासाठी दरमहा २५ हजार रुपये वेतन आहे.

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रतावेतन
सहाय्यक प्राध्यापक२Ph.D. किंवा संबंधित क्षेत्रातील Master’s Degree₹२५,००० ते ₹४५,०००
वैद्यकीय अधिकारी१MBBS किंवा BAMS₹२५,०००

मुक्ताईनगर येथील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि सर्व संलग्नक जोडणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करण्याच्या तारखा अनुक्रमे १ आणि ३ सप्टेंबर २०२६ आहेत. अर्ज असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर – ४२५ ३०६, जिल्हा जळगाव या पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे.

दोन्ही भरती प्रक्रियेत अर्जामध्ये आवश्यक माहिती पूर्णपणे भरणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात. तसेच अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात आणि शैक्षणिक पात्रतेच्या अटी काळजीपूर्वक तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

📑PDF जाहिरात-1https://lnk.ua/pUGgTuBzE
📑PDF जाहिरात-2https://lnk.ua/5GFTljEld
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpkv.ac.in/
📑 PDF जाहिरात -1https://lnk.ua/90lXnNmYf
📑 PDF जाहिरात -2https://lnk.ua/N3fD7vm8V
✅ अधिकृत वेबसाईटhttp://www.ackaradmpkv.edu.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा