AIIMS नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: वैद्यकीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी AIIMS नागपूरने आणखी एक संधी खुली केली आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये “प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (लॅब टेक्निशियन), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (पंचकर्म टेक्निशियन)” आणि “प्रोजेक्ट नर्स I” या पदांसाठी एकूण ५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २३ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

AIIMS नागपूरकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या स्वरूपानुसार ठरविण्यात आली असून, संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी आणि आवश्यक अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹१८,०००/- इतके निश्चित मानधन दिले जाणार आहे.

AIIMS नागपूर भरती 2025 – पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (लॅब टेक्निशियन)0110वी उत्तीर्ण + MLT डिप्लोमा / ITI किंवा संबंधित विषयात पदवी + अनुभव₹18,000/-
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I (पंचकर्म टेक्निशियन)0210वी उत्तीर्ण + पंचकर्म डिप्लोमा किंवा संबंधित विषयात पदवी + अनुभव₹18,000/-
प्रोजेक्ट नर्स I02Auxiliary Nurse & Midwife (ANM) दोन वर्षांचा अभ्यासक्रम₹18,000/-

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी AIIMS नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर https://aiimsnagpur.edu.in/ जाऊन जाहिरातीत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अनुभवाचे दस्तऐवज योग्य प्रकारे अपलोड करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२५ असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे.

ही भरती अल्पकालीन असली तरी सरकारी संस्थेमध्ये अनुभव मिळविण्याची ही एक चांगली संधी ठरू शकते. त्यामुळे संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

AIIMS Nagpur Bharti 2025

PDF जाहिरातhttps://shorturl.at/oRbFo
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/4rwTl
अधिकृत वेबसाईटhttps://aiimsnagpur.edu.in/

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे ‘ज्येष्ठ निवासी’ या पदासाठी तब्बल ७८ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मे २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेतील Post Graduate Medical Degree असणे आवश्यक आहे. तसेच निवड झाल्यानंतर उमेदवारांकडे NMC/MCI/MMC/DCI चा वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹67,700/- इतके आकर्षक वेतन मिळणार आहे.

All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2025 – पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ज्येष्ठ निवासी78

शैक्षणिक पात्रता – AIIMS Nagpur Recruitment 2025

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ निवासीPost Graduate Medical Degree व संबंधित नोंदणी आवश्यक

वेतनश्रेणी – AIIMS Nagpur Job 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
ज्येष्ठ निवासी₹67,700/- प्रति महिना

वयोमर्यादा ३५ वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी AIIMS नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचना आणि जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. सर्व अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी AIIMS नागपूरची अधिकृत वेबसाईट https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट द्या. ही भरती आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाची असून इच्छुक उमेदवारांनी संधीचे सोनं करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

 PDF जाहिरातhttps://shorturl.at/1Q8Sl
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/5siPu
अधिकृत वेबसाईटhttps://aiimsnagpur.edu.in/