PCMC Shikshak Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षक आणि संगणक प्रशिक्षक अशा एकूण 226 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखा ७ मेपासून १२ मे २०२५ पर्यंत आहेत.
शिक्षक पदांसाठी तीन वेगवेगळ्या विभागांतून भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यात २०१, ९ आणि ४ अशा तीन विभागांतून शिक्षक पदांसाठी वेगवेगळ्या अर्ज मागवण्यात आले आहेत. याशिवाय संगणक प्रशिक्षक पदासाठीही १२ जागांची भरती होणार आहे. सर्वच पदांसाठी पात्रता अटी, शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी पदाच्या स्वरूपानुसार असून, मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिक्त पदांचा तपशील: PCMC Shikshak Recruitment 2025
पदाचे नाव | पदसंख्या | अर्ज करण्याची अंतिम तारीख |
---|---|---|
शिक्षक | 201 | ८ मे २०२५ |
शिक्षक | 09 | ७ मे २०२५ |
शिक्षक | 04 | ९ मे २०२५ |
संगणक प्रशिक्षक | 12 | १२ मे २०२५ |
संगणक प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे संबंधित क्षेत्रातील ITI (COPA/DTP), डिप्लोमा, B.E., किंवा कोणतेही पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT कोर्समध्ये लागणाऱ्या सॉफ्टवेअर्सचे ज्ञान, ऑफिस ऑटोमेशन कौशल्ये आणि पूर्वानुभव असणेही अपेक्षित आहे.
सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वीकारले जातील. पोस्ट किंवा कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा अर्ज बाद केला जाईल.
या भरती प्रक्रियेमुळे अनेकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्थिर आणि सन्मानजनक नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी अधिक वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जाहिरात तपासावी आणि लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ भेट द्या – www.pcmcindia.gov.in
PDF जाहिरात | https://shorturl.at/78hih |
PDF जाहिरात | https://shorturl.at/78hih |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/78hih |
PCMC Bharti 2025
PDF जाहिरात | https://shorturl.at/78hih |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/DeuhN |
अधिकृत वेबसाईट | pcmcindia.gov.in |