मुंबई | SNDT महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध शैक्षणिक आणि प्रशासनिक पदांसाठी भरती (SNDT Womens University Bharti 2025) जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, परिचर, अधिष्ठाता, मानव्यविद्या विद्याशाखा, कुलगुरू, प्राध्यापक आणि प्राचार्य या पदांचा समावेश आहे.
विद्यापीठाने एकूण 10 जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2025 असून उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी निश्चितपणे सादर करावा.
SNDT Womens University Bharti 2025
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| सहाय्यक प्राध्यापक | 01 |
| प्रकल्प सहयोगी | 01 |
| प्रकल्प सहाय्यक | 02 |
| कार्यालय सहाय्यक | 02 |
| परिचर | 01 |
| अधिष्ठाता, मानव्यविद्या विद्याशाखा, कुलगुरू | 01 |
| प्राध्यापक | 01 |
| प्राचार्य | 01 |
| एकूण | 10 |
विद्यापीठाने सर्व इच्छुक उमेदवारांना सूचना दिली आहे की, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, कारण पदानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी वेगवेगळ्या असू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज संबंधित पदांसाठी योग्य स्वरूपात भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा:
अर्ज सादर करण्याचा पत्ता :
SNDT महिला विद्यापीठ,
1, नाथीबाई ठाकरसी रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई-400 020
विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर sndt.ac.in अर्जासंबंधी सविस्तर सूचना उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र जोडावे.
विद्यापीठाने उमेदवारांना विनंती केली आहे की, अर्ज वेळेत सादर केला नाही किंवा आवश्यक कागदपत्रे जोडली नाहीत तर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
ही भरती शैक्षणिक तसेच प्रशासनिक क्षेत्रातील आवडीच्या उमेदवारांसाठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी उशीर न करता, लवकर अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/aYExW |
| अर्ज नमुना (डीन, मानव्यविद्या विद्याशाखा, प्राध्यापक, डॉ. आंबेडकर चेअर, प्राचार्य, एसएनडीटी लॉ स्कूल, मुंबई) जाहिरातीसरकारी नोकऱ्या | https://shorturl.at/aYExW |
| अर्ज नमुना (सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प सहयोगी) | https://shorturl.at/aYExW |
| अर्ज नमुना (प्रकल्प सहाय्यक, कार्यालय सहाय्यक आणि परिचर) | https://shorturl.at/aYExW |
| अधिकृत वेबसाईट | https://sndt.ac.in/ |
