अमरावती जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी(Amravati Anganwadi Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका (मानधनी सेवा) – उर्दू भाषिक या पदाच्या 2 जागा आहेत. तसेच अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा) – मराठी भाषिक आणि उर्दू भाषिक या पदांच्या मिळून 11 जागा आहेत.
अमरावती अंगणवाडी भरती 2026 : Amravati Anganwadi Bharti 2026
| पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| अंगणवाडी मदतनीस | 11 | 12वी उत्तीर्ण |
| अंगणवाडी सेविका | 02 | 12वी उत्तीर्ण |
| एकूण | 13 |
हेही वाचा : IUCAA Pune Bharti 2026 | IUCAA पुणे येथे विविध पदांची भरती; 26 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
ISRO-ICRB Bharti 2026 | ISRO-ICRB मध्ये BE/B.Tech उमेदवारांसाठी 175 जागांची भरती; शास्त्रज्ञ/अभियंता पदासाठी संधी
या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण अशी देण्यात आली आहे. त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात सादर करायचा आहे.
अर्ज कुठे करायचा?
उमेदवारांनी आपला अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती शहर पूर्व, दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती या कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करायचा आहे. अर्ज कार्यालयीन वेळेत, शासकीय सुट्ट्या वगळता, समक्ष स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, चालू वीज बिल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रिका यांचा समावेश आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.
विधवा उमेदवारांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे. उमेदवाराकडे संबंधित अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्रही अर्जासोबत सादर करावे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, कागदपत्रे आणि अर्जासंदर्भातील सर्व अटी तपासाव्यात. या भरतीसाठी अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2026 असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/1zQwfGnxT |
| अधिकृत वेबसाईट | amravati.gov.in |
