ISRO-ICRB Bharti 2026 | ISRO-ICRB मध्ये BE/B.Tech उमेदवारांसाठी 175 जागांची भरती; शास्त्रज्ञ/अभियंता पदासाठी संधी

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात(ISRO-ICRB Bharti 2026)आणि केंद्रीय भरती मंडळ म्हणजेच ICRB अंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ पदासाठी 175 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या BE/B.Tech उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2026 आहे.

या भरतीमध्ये Electronics, Mechanical आणि Computer Science या तीन प्रमुख शाखांतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये Scientist/Engineer ‘SC’ (Electronics) साठी 99 जागा, Mechanical साठी 52 जागा आणि Computer Science साठी 21 जागा आहेत. याशिवाय Autonomous Body [PRL] अंतर्गत Electronics, Mechanical आणि Computer Science या प्रत्येक शाखेसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.

पदनिहाय रिक्त जागा : ISRO-ICRB Bharti 2026

पद / शाखारिक्त जागा
Scientist/Engineer ‘SC’ – Electronics99
Scientist/Engineer ‘SC’ – Mechanical52
Scientist/Engineer ‘SC’ – Computer Science21
Scientist/Engineer ‘SC’ – Electronics – PRL01
Scientist/Engineer ‘SC’ – Mechanical – PRL01
Scientist/Engineer ‘SC’ – Computer Science – PRL01
एकूण175

हेही वाचा : Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिकेत 63 पदांसाठी भरती; 7 आणि 8 सप्टेंबरला मुलाखती

ना परिक्षा, ना मुलाखत.. फक्त १०वीच्या मेरिटवर ३०,००० महिना पगाराची भारतीय टपाल खात्यात नोकरी; २५ हजारांहून अधिक पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Indian Post GDS Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता

Electronics शाखेतील पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून Electronics & Communication Engineering मध्ये BE/B.Tech किंवा समकक्ष पदवी आवश्यक आहे. Mechanical शाखेसाठी Mechanical Engineering मधील BE/B.Tech किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे. Computer Science पदासाठी Computer Science Engineering मधील BE/B.Tech किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

या तिन्ही शाखांसाठी उमेदवारांनी किमान 65 टक्के गुण किंवा 10 पैकी 6.84 CGPA मिळवलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. वयोमर्यादा आणि इतर पात्रतेच्या अटींबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वेतन

Scientist/Engineer ‘SC’ पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा किमान 56,100 रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे ISRO सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्यासोबतच आकर्षक वेतनाची संधीही उमेदवारांना मिळणार आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून सुरुवातीला 750 रुपये Processing Fee घेतली जाणार आहे. त्यापैकी 250 रुपये Non-refundable Application Fee असून उर्वरित Processing Fee संबंधित नियमांनुसार परत केली जाणार आहे. महिला, SC/ST, PwBD आणि Ex-Servicemen उमेदवारांना 750 रुपयांची Processing Fee पूर्णपणे परत केली जाणार आहे. इतर उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क राहणार आहे.

अर्ज कसा करावा?

ISRO-ICRB भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ISROच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशनमधील शैक्षणिक पात्रता, शाखा, वयोमर्यादा, शुल्क आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

अर्जामध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी. आवश्यक कागदपत्रे नियमानुसार अपलोड करून अर्ज शुल्काची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत आणि संबंधित पावती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरतीसंदर्भातील अधिकृत आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ISROच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/pgY9WQLLM
ऑनलाईन अर्ज कराhttps://lnk.ua/x5PZc9oNJ
अधिकृत वेबसाईटhttps://www.isro.gov.in/index.html

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा