मुंबई | आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँक लिमिटेड (AP Mahesh Co-operative Urban Bank) या नामांकित सहकारी बँकेत नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बँकेच्या मुंबई विभागात “लिपिक कम कॅशियर” या पदांसाठी भरती ( AP Mahesh Bank Bharti 2025) प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. एकूण ५० रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२५ आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करणे आवश्यक आहे.
कोण पात्र आहे? AP Mahesh Bank Bharti 2025
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, MS Office, इंटरनेट वापराचे ज्ञान आणि स्थानिक भाषेचे (मराठी किंवा तेलुगू) समज-उमज असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा व इतर अटी – AP Mahesh Bank Recruitment 2025
उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, अर्ज करताना ₹१०००/- (GST सह) इतके शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे.
वेतनश्रेणी
भरती होणाऱ्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा अंदाजे ₹२२,६००/- एवढे एकूण वेतन मिळेल.
अर्ज कसा करायचा? – How to Apply for AP Mahesh Bank Recruitment 2025
उमेदवारांनी https://www.apmaheshbank.com/home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती वाचावी आणि अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सूचनांचे वाचन करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
महत्त्वाच्या तारखा:
| तपशील | माहिती |
|---|---|
| पदाचे नाव | लिपिक कम कॅशियर |
| एकूण पदसंख्या | ५० |
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक |
| वयोमर्यादा | २० ते २८ वर्षे |
| अर्ज शुल्क | ₹१०००/- (GST सह) |
| अर्जाची अंतिम तारीख | १४ जून २०२५ |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत संकेतस्थळ | apmaheshbank.com |
सूचना: अधिक तपशीलांसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली भरतीची मूळ PDF जाहिरात वाचावी. ही एक चांगली संधी असून, इच्छुकांनी ती नक्कीच साधावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/auf42 |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/3zjRf |
| अधिकृत वेबसाईट | https://www.apmaheshbank.com/home.aspx |
