बँकिंग आणि आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडियाने(Bank of India 2026)एक महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि अधिकारी अशा विविध पदांच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून 10 सप्टेंबर 2026 पासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे.
या भरतीमध्ये आयटी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक पदांचा समावेश आहे. Full-Stack Engineering, Digital Platforms, Data Engineering, Information Security, Cyber Security, Database Administration, DevSecOps Engineering, Data Analytics यांसह Law Officer, Fire Officer, Security Officer आणि Civil Engineer या पदांचाही समावेश आहे.
पदनिहाय जागांचा तपशील : Bank of India 2026
| स्केल | पदांचा प्रकार | पदसंख्या |
|---|---|---|
| Scale IV | Chief Manager | 10 |
| Scale III | Senior Manager | 49 |
| Scale II | Manager | 118 |
| Scale I | Officer | 28 |
| एकूण | 205 |
Scale IV अंतर्गत Chief Manager पदांच्या एकूण 10 जागा आहेत. यामध्ये Full-Stack Engineering, Digital Platforms, Supply Chain/Trade Finance Technology, Digital Banking Operations, IT Procurement, IT आणि Information Security यांसारख्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी वयोमर्यादा पदानुसार 28 ते 42 वर्षांपर्यंत आहे.
Scale III अंतर्गत Senior Manager पदांच्या 49 जागा असून Full-Stack Engineering, Digital Platforms, Finacle Application Support, Infrastructure Operations, Solution & Technology Architecture, Data Engineering, API Governance & Security, DevSecOps Engineering, Information Security आणि IT Procurement Specialist यांसारख्या पदांचा समावेश आहे.
Scale II अंतर्गत सर्वाधिक 118 जागा आहेत. यामध्ये Manager – Full-Stack Engineering, Digital Platforms, Application Support & Operations, Infrastructure Operations, Data Analytics, DevSecOps Engineering, Information Security, Law Officer, Fire Officer आणि Security Officer यांसह विविध पदे आहेत.
Scale I अंतर्गत Officer पदांच्या 28 जागा आहेत. यामध्ये Full-Stack Engineering, Application Support & Operations, Data Analytics, Data Engineering, QA & Test Engineering, Information Security आणि Civil Engineer या पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीतील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. विविध आयटी पदांसाठी संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech, MCA, M.Tech किंवा समकक्ष पात्रता आवश्यक असल्याचे दिले आहे. काही पदांसाठी किमान 50 टक्के गुणांची अट आहे. Information Security आणि संबंधित काही पदांसाठी CISA, CISM किंवा CISSP यांसारख्या पात्रतांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Law Officer, Fire Officer, Security Officer आणि Civil Engineer या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची संपूर्ण शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
भरतीतील पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. काही Officer पदांसाठी 21 ते 30 वर्षे, तर Manager पदांसाठी साधारणपणे 25 ते 35 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. Senior Manager पदांसाठी पदानुसार 28 ते 40 वर्षांपर्यंत, तर Chief Manager पदांसाठी 28 ते 42 वर्षांपर्यंत वयोमर्यादा दिली आहे.
वेतनश्रेणी
बँक ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये विविध स्केलनुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे आहे:
| स्केल | वेतनश्रेणी |
|---|---|
| JMGS-I | ₹48,480 ते ₹85,920 |
| MMGS-II | ₹64,820 ते ₹93,960 |
| MMGS-III | ₹85,920 ते ₹1,05,280 |
| SMGS-IV | ₹1,02,300 ते ₹1,20,940 |
हेही वाचा : Income Tax Department Bharti 2026 | आयकर विभागात 82 पदांची भरती; पदवीधर आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
IBPS RRB Bharti 2026 | IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी पदांची मोठी भरती; पदवीधारकांना संधी
अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा
SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी 175 रुपये, तर सामान्य आणि इतर उमेदवारांसाठी 1,180 रुपये अर्ज शुल्क आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून 25 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जातील सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचनांनुसारच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
| PDF जाहिरात | https://lnk.ua/9ZBBipZ91 |
| ऑनलाईन अर्ज करा (१० सप्टेंबर पासून ) | https://lnk.ua/7HXRkQgmG |
| अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |
