Central Bank of India Bharti 2026: अंतर्गत परकीय चलन अधिकारी आणि विपणन अधिकारी या पदांसाठी एकूण 350 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. देशभरातील पात्र पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.
या भरती प्रक्रियेत दोन पदांचा समावेश असून त्यामध्ये परकीय चलन अधिकारी आणि विपणन अधिकारी या पदांचा समावेश आहे. एकूण 350 पदांपैकी परकीय चलन अधिकारी पदासाठी 50 जागा तर विपणन अधिकारी पदासाठी 300 जागा उपलब्ध आहेत. संबंधित पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अटी वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| परकीय चलन अधिकारी | 50 |
| विपणन अधिकारी | 300 |
| एकूण | 350 |
परकीय चलन अधिकारी पदासाठी उमेदवाराने AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच CFA, CA किंवा संबंधित विषयातील MBA अशी व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
विपणन अधिकारी पदासाठी उमेदवाराने AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ पदवी तसेच विपणन विषयात विशेष शाखेसह MBA, PGDBA, PGDBM, PGPM किंवा PGDM ही दोन वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अथवा डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| परकीय चलन अधिकारी | कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी, CFA/CA/MBA असल्यास प्राधान्य |
| विपणन अधिकारी | पदवी + विपणन शाखेत MBA/PGDM/PGPM/PGDBM/PGDBA |
या भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान 22 वर्षे व कमाल 35 वर्षे इतके असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार ठरविण्यात आली असून, वयाची गणना जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेनुसार करण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये इतके ठेवण्यात आले आहे.
वेतनश्रेणी
| पदाचे नाव | वेतनश्रेणी (Basic Pay) |
|---|---|
| परकीय चलन अधिकारी | 85920-2680/5-99320-2980/2-105280 |
| विपणन अधिकारी | 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 |
अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक व पूर्ण भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तसेच अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/KSVTY |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/FpPKy |
| अधिकृत वेबसाईट | https://www.centralbankofindia.co.in/ |
