12वी पास उमेदवारांची CISF अंतर्गत भरती, 463 जागा; त्वरित अर्ज करा | CISF Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

CISF Bharti 2025: केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बलामध्ये (CISF) हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यंदा “जनरल ड्यूटी” तसेच “क्रीडा कोटा” अंतर्गत एकूण 433 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून प्रत्येक भरतीसाठी वेगवेगळ्या शेवटच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

जनरल ड्यूटी अंतर्गत 403 जागांची भरती – CISF Bharti 2025

403 जागांवर “हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)” पदासाठी भरती होत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान १२वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १८ मे २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जून २०२५ आहे. पात्र उमेदवारांनी https://www.cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करावा.

या पदासाठी मिळणाऱ्या पगाराची श्रेणी ₹२५,५०० ते ₹८१,१०० प्रति महिना इतकी आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/COp6A
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/W1gip
अधिकृत वेबसाईटhttps://www.cisf.gov.in/
क्रीडा कोटा अंतर्गत ३० जागांची भरती (दोन वेळा जाहिरात)

CISF अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (क्रीडा कोटा)” या पदासाठी देखील ३० जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण असावे आणि त्यांनी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांचे प्रतिनिधित्व केलेले असावे. विशेषतः हॉकी क्रीडाक्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

या भरतीसाठी दोन स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे:

जाहिरातअर्ज सुरू होण्याची तारीखशेवटची तारीख
पहिली10 मे 202516 मे 2025
दुसरी11 मे 202530 मे 2025

वेतनश्रेणी – ₹२५,५०० ते ₹८१,१०० (पे लेव्हल ४) प्रति महिना.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/EMATp
PDF जाहिरातhttps://shorturl.at/KDw0J
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/W1gip
अधिकृत वेबसाईटhttps://www.cisf.gov.in/
अर्ज करण्याची सूचना

सर्व इच्छुक उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सादर करणे अनिवार्य आहे. अपूर्ण किंवा अयोग्य अर्ज नाकारले जातील.

भरतीसंबंधी अधिक माहिती आणि सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे https://www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा