भारतीय हवाई दलात 153 रिक्त जागांची भरती; नविन जाहिरात प्रकाशित | Indian Air Force Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Indian Air Force Bharti 2025: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हवाई दलात एलडीसी, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार, रंगारी, एमटीएस, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमन, हाऊस कीपिंग स्टाफ, व्हल्कनायझर आणि ड्रायव्हर या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जून २०२५ अशी आहे.

या पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही संबंधित पदानुसार वेगवेगळी आहे. काही पदांसाठी १०वी उत्तीर्ण, तर काहींसाठी १२वी उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून सविस्तर माहिती घ्यावी. उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी उपलब्ध असलेल्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे: Indian Air Force Bharti 2025

पदाचे नावपदांची संख्या
LDC14
Hindi Typist2
Cook12
Store Keeper16
Carpenter3
Painter3
MTS (Multi Tasking)53
Mess Staff7
Laundryman3
House Keeping Staff31
Vulcaniser1
Driver8

अर्ज पाठवण्याचा पत्ता खालीलप्रमाणे आहे:

  • पश्चिम बंगाल: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग, पानागढ, पश्चिम बंगाल – 713148
  • आसाम: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, तेजपूर, आसाम – 784104
  • हरियाणा: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, अंबाला, अंबाला कॅन्ट (हरियाणा) – 133001
  • नवी दिल्ली: एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिस, सुब्रोतो पार्क, नवी दिल्ली – 110010

उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली मूळ जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून ती योग्य पत्त्यावर वेळेत पाठवणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट: https://indianairforce.nic.in
शेवटची तारीख: १५ जून २०२५

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/oOMX3
अधिकृत वेबसाईटhttps://indianairforce.nic.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा