डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूरमध्ये विविध पदांची मोठी भरती, संधी चुकवू नका | DY Patil Group Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

DY Patil Group Bharti 2025: डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर अंतर्गत शैक्षणिक तसेच प्रशासकीय व तांत्रिक विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसह इतर पदांचा समावेश आहे.

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने hrcorporate@dypgroup.org या पत्त्यावर सादर करायचे असून अंतिम तारीख 05 डिसेंबर 2025 आहे. पात्रता संबंधित पदाच्या गरजेनुसार असून प्राध्यापक पदांसाठी AICTE व शिवाजी विद्यापीठाच्या नियमांनुसार अनुभव व वेतनमान लागू राहणार आहे.

तसेच, संस्थेमध्ये बस ड्रायव्हर पदांच्या 12 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 आहे. अर्ज एच.आर. विभाग, कॉर्पोरेट ऑफिस, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, कसबा बावडा, कोल्हापूर या पत्त्यावर पाठवायचा आहे.

यासोबतच क्रीडा प्रभारी, वाहतूक प्रभारी, कॅम्पस प्रभारी आणि लँडस्केप डिझायनर या पदांसाठी एकूण 04 जागा जाहीर करण्यात आल्या असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण कोल्हापूर राहणार असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट dypgroup.edu.in ला भेट द्यावी.

DY Patil Group Bharti 2025

PDF जाहिरातhttps://shorturl.at/5WTVp
अधिकृत वेबसाईटdypgroup.edu.in

PDF जाहिरातhttps://shorturl.at/5WTVp
अधिकृत वेबसाईटdypgroup.edu.in

PDF जाहिरातhttps://shorturl.at/5WTVp
अधिकृत वेबसाईटdypgroup.edu.in

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा