अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी इंजीनियर्स इंडिया लिमिटेड(Engineers India Limited Recruitment 2026)ने मोठी रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन कंपनी असलेल्या इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत “सहयोगी अभियंता श्रेणी-I” (Associate Engineer Grade I) पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2026 आहे.
या भरतीअंतर्गत पाइपलाइन/पायपिंग अभियंता, ऑफशोअर स्ट्रक्चरल अभियंता आणि प्रकल्प अभियंता अशा विविध विशेष शाखांमध्ये नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 32 वर्षे असावे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार असून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे.
भरतीतील पदनिहाय रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : Engineers India Limited Recruitment 2026
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| सहयोगी अभियंता श्रेणी-I (Pipeline/Piping Engineer) | 06 |
| सहयोगी अभियंता श्रेणी-I (Offshore Structural Engineer) | 04 |
| सहयोगी अभियंता श्रेणी-I (Project Engineer) | 02 |
| एकूण | 12 |
हेही वाचा : NIC Bharti 2026 | NIC मध्ये 376 पदांची भरती! पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
Supreme Court of India Bharti 2026 | सुप्रीम कोर्टमध्ये नोकरीची संधी! सहाय्यक कुलसचिव पदासाठी भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, पाइपलाइन/पायपिंग अभियंता पदासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) मध्ये किमान 60 टक्के गुणांसह बीई, बीटेक किंवा बीएससी (इंजिनिअरिंग) पदवी आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ऑफशोअर स्ट्रक्चरल अभियंता पदासाठी सिव्हिल, ओशन, मरीन किंवा नेव्हल आर्किटेक्चर शाखेतील पदवी आवश्यक असून संबंधित डिझाइन आणि स्ट्रक्चरल प्रकल्पांचा अनुभव अपेक्षित आहे. प्रकल्प अभियंता पदासाठी मेकॅनिकल, सिव्हिल, ओशन, मरीन किंवा नेव्हल आर्किटेक्चर शाखेतील पदवीसह किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना शहरांच्या श्रेणीनुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. X श्रेणी शहरांमध्ये दरमहा 64,000 रुपये, Y श्रेणी शहरांमध्ये 60,800 रुपये आणि Z श्रेणी शहरांमध्ये 57,600 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
| पद | वेतन |
|---|---|
| सहयोगी अभियंता श्रेणी-I | ₹57,600 ते ₹64,000 प्रति महिना |
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रतेची खात्री करून घ्यावी. अर्ज अंतिम तारखेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत काम करण्याची ही एक चांगली संधी असून इच्छुकांनी 8 सप्टेंबर 2026 पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी
| PDF जाहिरात | https://lnk.ua/zAN0fVqTX |
| ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/1Sqy5dlVc |
| अधिकृत वेबसाईट | https://engineersindia.com/ |
