ICSIL Bharti 2026: अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार पदांसाठी भरती; 14 ऑगस्टला मुलाखत

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

ICSIL Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. Intelligent Communication Systems India Limited (ICSIL) अंतर्गत अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही ऑनलाइन परीक्षा देण्याची आवश्यकता नसून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 14 ऑगस्ट 2026 आहे.

ICSIL भरती 2026 मधील पदे

पदाचे नावरिक्त जागा
अग्निशमन कर्मचारी03
प्रयोगशाळा परिचर01
सफाई कामगार01
एकूण05

शैक्षणिक पात्रता – ICSIL Bharti 2026

अग्निशमन कर्मचारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच Fire Safety चे कार्यज्ञान असणे अपेक्षित आहे.

प्रयोगशाळा परिचर पदासाठी उमेदवार मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा किंवा Science विषयातील पदवीधारक असावा.

सफाई कामगार पदासाठी उमेदवाराला हिंदी किंवा संबंधित प्रादेशिक भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे. वयाची अट आणि इतर पात्रता तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा वेतन दिले जाणार आहे.

पदाचे नाववेतन
अग्निशमन कर्मचारी₹22,411/-
प्रयोगशाळा परिचर₹18,456/-
सफाई कामगार₹18,456/-

मुलाखत कुठे होणार?

ICSIL भरतीसाठी मुलाखत D.P. Rastogi Central Research Institute for Homoeopathy (CRIH), A-11, Sector 24, Noida, Uttar Pradesh – 201301 येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुलाखतीची तारीख: 14 ऑगस्ट 2026

पात्र उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहताना शैक्षणिक पात्रता, ओळखपत्र, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. कागदपत्रांची अचूक यादी आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि पत्त्यावर वेळेत उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/VMOP9j9xG
अधिकृत वेबसाईटicsil.in

हे वाचा : ICAR-CIRCOT Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत भरती सुरू; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
Janata Sahakari Bank Kolhapur Bharti 2026 | कोल्हापूरमध्ये बँकेत नोकरीची संधी! जनता सहकारी बँक भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज, जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा