इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 जागांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, 31 मे शेवटची तारीख | Indian Overseas Bank Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) स्थानिक बँक अधिकारी (LBO – Local Bank Officer) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे.

Indian Overseas Bank Bharti 2025

एलबीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक तपशीलासाठी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. वय मोजताना 1 मे 2025 ही कटऑफ तारीख धरली जाईल. आपले अचूक वय मोजण्यासाठी ऑनलाईन Age Calculator चा उपयोग करता येईल.

अर्ज शुल्काच्या बाबतीत सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ₹850 (GST सह) इतके शुल्क आहे. अनुसूचित जाती, जमाती (SC/ST) तसेच दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी फक्त सूचना शुल्क ₹175 (GST सह) आकारले जाईल.

बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या पगार संरचनेनुसार, एलबीओ पदाचा प्रारंभिक मूलभूत पगार ₹48,480 असून त्यात नियमित वेतनवाढीनुसार अधिकतम ₹85,920 पर्यंत वाढ होऊ शकते.

पदाचे नावएकूण पदसंख्या
एलबीओ (स्थानिक बँक अधिकारी)400
शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर₹48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-2680/7-85,920

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत भरती संदर्भातील सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी https://www.iob.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज 12 मे 2025 पासून सुरु झाले असून, 31 मे 2025 ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे वेळेवर अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 12 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2025
Advertisement READ PDF
Online Application LinkApply Online
Official WebsiteOfficial Website

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा