भारतीय सैन्य भरती 2025 : १२वी नंतर थेट अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी | Indian Army Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Indian Army Bharti 2025: भारतीय सैन्य दलात अधिकारी बनण्याची मोठी संधी आहे. १२वी उत्तीर्ण आणि जेईई (मेन्स) 2025 दिलेल्या युवकांसाठी “कमिशन्ड ऑफिसर (१०+२ टीईएस-५४ कोर्स जानेवारी २०२६)” अंतर्गत 90 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या कोर्सद्वारे थेट सैन्य अधिकारी होण्याचा मार्ग खुला होतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जून 2025 आहे.

सदर भरतीसाठी 13 मे 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठीची माहिती पुढीलप्रमाणे आहे: Indian Army Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
कमिशन्ड ऑफिसर (१०+२ टीईएस-५४ कोर्स जानेवारी २०२६)90

या कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक अटी आहेत. उमेदवाराने १२वीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांमध्ये किमान 60% गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराने JEE (Mains) 2025 ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. ही अट TES-54 कोर्ससाठी बंधनकारक आहे.

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय अर्ज सादर करताना १६ १/२ वर्षांपेक्षा कमी आणि १९ १/२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ही भरती भारतीय सैन्याच्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत केली जाणार आहे. TES म्हणजे Technical Entry Scheme, ज्यामध्ये थेट १२वी नंतर उमेदवारांना प्रशिक्षणाद्वारे सैन्यात अधिकारी म्हणून सामील होता येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळते.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जून 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली जाईल, जिथून उमेदवार थेट अर्ज करू शकतील.

PDF जाहिरात – 1https://shorturl.at/8UHNF
PDF जाहिरात – 2https://shorturl.at/1llAg
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/i0ATk
अधिकृत वेबसाईटhttps://www.joinindianarmy.nic.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा