India Post GDS Recruitment 2026 : 28 हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची शक्यता, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

India Post GDS Recruitment 2026: भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. India Post GDS Online Engagement Schedule-II (July 2026) अंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून, पात्र उमेदवारांना 2 सप्टेंबर 2026 पासून अर्ज करता येणार आहेत.

यावेळी 28 हजारांहून अधिक पदांसाठी भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रिक्त पदांची अंतिम संख्या अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या Schedule-I 2026 भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी सुमारे 28,740 जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.

कोणत्या पदांसाठी होणार भरती? India Post GDS Recruitment 2026

India Post GDS भरतीअंतर्गत मुख्यतः खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

पदाचे नाव
Branch Postmaster (BPM)
Assistant Branch Postmaster (ABPM)
Dak Sevak

पात्रता काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित राज्य किंवा पोस्टल सर्कलची स्थानिक भाषा 10वीमध्ये विषय म्हणून शिकलेली असावी.

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 40 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
  • सायकल चालविण्याचे ज्ञान आवश्यक
  • भारतीय नागरिकत्व अनिवार्य

निवड प्रक्रिया कशी असेल?

India Post GDS भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या भरतीसाठी सामान्यतः कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाते. त्यामुळे अर्ज भरताना शैक्षणिक माहिती अचूक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अधिकृत वेबसाईट – India Post GDS Recruitment 2026 (लवकरच याठिकाणी अधिकृत शेड्यूल्ड जाहीर केले जाईल)

अर्ज प्रक्रिया

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना GDS Online Engagement Portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना 10वीची गुणपत्रिका, फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वेतन किती मिळते?

पदमासिक वेतन (TRCA)
Branch Postmaster (BPM)₹12,000 ते ₹29,380
Assistant Branch Postmaster (ABPM)₹10,000 ते ₹24,470
Dak Sevak₹10,000 ते ₹24,470

याशिवाय नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर सुविधा देखील मिळू शकतात.

एकंदरीत, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी India Post GDS Recruitment 2026 ही मोठी रोजगार संधी ठरणार आहे. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता, रिक्त पदे आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा.

अधिकृत वेबसाईट – India Post GDS Recruitment 2026 (लवकरच याठिकाणी अधिकृत शेड्यूल्ड जाहीर केले जाईल)


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा